‘चुकीचे मृतदेह मिळाले’

अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा


लंडन : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताबाबत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह अद्याप त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अशातच, पाठवण्यात आलेल्या मृतदेहांपैकी १२ मृतदेह चुकीच्या ठिकाणी पोहोचले आहेत. लंडनमधील पीडित कुटुंबांचे काम पाहणाऱ्या वकिलांनी हा दावा केला आहे. लंडनमध्ये जेव्हा हे मृतदेह तपासण्यात आले, तेव्हा ते दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे आढळून आले.


अद्याप या प्रकरणात एअर इंडियाकडून कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही.
या विमान अपघातात क्रू मेंबर्स व इतरांसह २६९ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतांमध्ये ५२ ब्रिटिश नागरिकांचाही समावेश होता. हा अपघात इतका भयानक होता की, मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले. त्यानंतर डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आणि मृतदेह संबंधित कुटुंबांकडे पाठवण्यात आले.


१२ मृतदेहांचे अवशेष परत पाठवले


अपघातातील पीडितांच्या कुटुंबांचे प्रतिनिधित्व करणारे वकील जेम्स हिली प्रॅट यांनी डेली मेलला सांगितले की, किमान १२ ब्रिटिश नागरिकांचे अवशेष परत पाठवण्यात आले आहेत. मी एका महिन्यापासून या ब्रिटिश कुटुंबांच्या संपर्कात आहे.


या लोकांना फक्त त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह परत हवे आहेत. यापैकी अनेकांना अद्याप त्यांच्या प्रियजनांचे अवशेषही मिळालेले नाहीत. काही लोकांना मृतदेह मिळाले, पण ते त्यांच्या प्रियजनांचे नाहीत. हा एक गंभीर निष्काळजीपणा आहे. याबाबत स्पष्टीकरण मिळायला हवे. त्यांनी आशा व्यक्त केली की, ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर ब्रिटन दौऱ्यावर येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर हा मुद्दा नक्कीच उपस्थित करतील.

Comments
Add Comment

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त