
बँक निर्देशांकात कालची वाढ घसरणीत बदलली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक २३६.२५ अंकाने घसरला असून बँक निफ्टी १३६.१५ अंकाने घसरला आहे. सेन्सेक्स मिडकॅपमध्ये ०.२१% घसरण झाली आहे व स्मॉलकॅपमध्ये ०.१०% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅ प व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२५%,०.२४% घसरण झाली आहे. वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) सुद्धा सकाळच्या सत्रात चढ्यादराने दर्शविला जात आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून बाजारातील निर्देशांकाला सपोर्ट लेवल सत्र उघडल्यावर मिळू शकली नाही. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद कायम आहे. सर्वाधिक वाढ मिडस्मॉल हेल्थकेअर (०.८२%), हेल्थकेअर (०.६९%), फार्मा (०.५६%), मेटल (०.३१%) या समभागात वाढ झाली. सर्वाधिक घसरण आयटी (१.११%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (१.९१%) समभागात झाली.
काल युएस बाजारात चढ्या दराने स्थिरता दिसली होती. आशियाई बाजारातही उसळीची परिस्थिती कायम होती. जपान युएस टेरिफ डील नंतर गुंतवणूकदारांच्या भावनांना बळ मिळाले होते. याचा व चीनच्या धरण प्रकल्पामुळे चीन बाजारही गेल्या दोन तीन दिवसात चांगल्या अंकाने बंद झाला होता. याच पार्श्वभूमीवर टेरिफसाठी युएस जपान, इंडोनेशिया यानंतर चीन, युकेबाबत काय निर्णय घेतो याकडे वॉल स्ट्रीटचे लक्ष लागले आहे. ज्याचा वेळोवेळी परिणाम आशिया शेअर बाजारात अपेक्षितही आहे. युएस भारत बोलणीला स्थगिती मिळाल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Investors FII) यांचा ओढा व आवक भारतीय बाजारात गेल्या आठवड्यात घटली आहे. त्यामुळे सातत्याने डॉलरच्या तुलनेत रूपये घसरत असताना यापुढे पुढील 'ट्रिगर' काय असेल याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. मात्र जेन स्ट्रीट प्रकरणानंतर मिडकॅप व स्मॉलकॅपने अपेक्षित कामगिरी केली नाही. सेबीने पुन्हा एकदा या प्रकरणात सखोल चौकशी सुरू केल्याने बाजारात सावधातही बाळगली जात आहे.
आजच्या सत्राच्या सुरुवातीच्या सर्वाधिक वाढ ओलेक्टरा ग्रीनटेक (४.२९%), ग्रावीटा इंडिया (३.९१%), श्रीराम डीसीएम (३.४९%), डॉ रेड्डीज लॅब (२.९५%), आरसीएफ (२.६७%), टाटा मोटर्स (१.८७%), मदर्सन (२.२४%), अजंता फार्मा (१.४७%), डिक्सन टेक्नॉलॉजी (१.३७%),टाटा स्टील (१.०३%), इटर्नल (१.०१%), हिंदुस्थान कॉपर (०.७८%), श्रीराम फायनान्स (०.३७%), रेडिको खैतान (०.२६%), जिओ फायनांशियल सर्व्हिसेस (०.२१%), कॅनरा बँक (१.०२%), विप्रो (०.१०%) या समभागात झाली.
आजच्या सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण इंडियन एनर्जी (१०.००%), परसिटंट (७.९५%), कोफोर्ज (६.५६%), महानगर गॅस (३.९६%), इंडिया सिमेंट (२.२६%), ट्रेंट (२.२३%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (१.६१%), अदानी एनर्जी (१.४१%),सीजी पॉवर (१.१९%), सिमेन्स (०.८७%), इन्फोसिस (०.८४%),बजाज हाऊसिंग (०.८४%), एनटीपीसी (०.७३%), रामकृष्ण फोर्ज (०.७१%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.६५%), टीसीएस (०.४८%), एसबीआय (०.४८%), आयसीआयसीआय बँक (०.३९%), एचडीएफसी बँक (०.३४%), लोढा डेव्हलपर (१.०७%), कोल इंडिया (०.६७%) समभागात झाली.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,'अमेरिकेने अनेक देशांसोबत व्यापार करार केल्याने टॅरिफ वॉरशी संबंधित चिंता हळूहळू दूर होत आहे. जरी या वर्षी जागतिक व्यापारावर परिणाम झाला आहे आणि जागतिक वाढ सुमारे २.८% वर मंदावली असली तरी, शेअर बाजार २०२६ मध्ये व्यापार आणि वाढीतील पुनर्प्राप्ती (Recovery ) हळूहळू कमी करत आहेत. हा आशावाद जागतिक शे अर बाजारांमधील लवचिकता आणि तेजीचे स्पष्टीकरण देतो. अमेरिकेच्या मूळ बाजारपेठेत, चांगले कॉर्पोरेट उत्पन्न बाजाराला मूलभूत आधार देत आहे. इन्फोसिसचे चांगले तिमाहीचे आकडे कमकुवत आयटी निर्देशांकाला आधार देऊ शकतात. परंतु आयटी क्षेत्रात अनावश्यक आशावादाला जागा नाही. संस्थात्मक क्रि याकलापांबद्दल (Activity) प्राथमिक बाजार मार्गाने गुंतवणूक करत असतानाही एफआयआय (Foreign Institutional Investors FII) रोख बाजारात सातत्यपूर्ण विक्रेते बनले आहेत.एफआयआय विक्रीचे मुख्य कारण म्हणजे भारतातील उच्च मूल्यांकन आणि इतर बाजारपेठांमध्ये तुलनेने स्वस्त मूल्यांकन आहे.'
सकाळच्या सत्रातील निफ्टीवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले की,'२५२१५ चा पहिला वरचा उद्दिष्ट साध्य केल्यानंतरही, क्षैतिज प्रतिकाराची उपस्थिती वगळता, थकवा येण्याची कोणती चिन्हे दिसत नाहीत. परंतु दिशात्मक निर्देशकांनी अद्याप ब्रेकआउट हालचालीसाठी पुरेसा गती दर्शविली नसल्यामुळे, फेवर्ड (अनुकूल) व्ह्यू एकत्रीकरणाची (Consolidation) अपेक्षा करतो.योगायोगाने, काल देखील मर्यादित वरचा दृष्टिकोन अनुकूल होता. त थापि, २५ ४०० पातळीचा ब्रेक उतरत्या विस्तारित वेज पॅटर्नची (Wage Pattern) परिपक्वता दर्शवू शकतो, ज्यामध्ये सध्याचे व्यवहार बसवले आहेत. आपण त्याची वाट पाहू, २५१७४/११३ पातळीवर लक्ष ठेवून, कारण विद्यमान सकारात्मक पूर्वाग्रह (Posi tive Bias) राख ण्यासाठी आधार महत्त्वाचा आहे.'
यामुळे आजच्या बाजारातील परिस्थिती पाहता अनिश्चितेचे चित्र कायम असले तरी फंडामेंटलचा आधारावर, निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील कामगिरी आधारे, तसेच बाजारातील घरगुती गुंतवणूकदारांकडून वाढीव गुंतवणूक झाल्यास परदेशी संस्थात्मक गुंतवणूक दारांकडून घटलेल्या गुंतवणूकीत भर पडू शकते. अखेर निर्देशांकात वाढ होईल का घसरण हे सांगणे सकाळच्या सत्रात कठीण असले तरी अखेरच्या सत्रात ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही होणारी हालचाल निर्देशांकात प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.