कंपनीच्या तिमाही निकालाबाबत - (Paytm Q1 Results)
कंपनीला पहिल्या तिमाहीत १२२.५ कोटींचा एकत्रित निव्वळ नफा (Consolidated Net Profit) कमावला आहे. याविषयी कंपनीने म्हटले होते की,आगामी काळात कंपनीला अधिक नफ्याची आशा आहे. जून अखेरपर्यंत पेटीएमने आपले वार्षिक उत्पन्न ३८% वाढवत ५२९ कोटींवर नेले. माहितीनुसार, कंपनीच्या ऑपरेटिंग कमाईत (Operating Income) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २८% वाढ झाल्याने ११९८ कोटींवर गेले आहे. निकालानुसार, कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर मागील वर्षी तिमाहीतील तुलनेत वाढ झाल्याने १२३ कोटींवर करोत्तर नफा गेला. तर ईबीटा (EBITDA करपूर्व कमाईत) पहिल्या तिमाहीत (Q1FY26) यामध्ये ७२ कोटींवर गेले आहे. मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला ८३९ कोटींचे नुकसान झाले होते. जे कंपनीने सावरत नफ्यात पालटले असले तरी निकाल जाहीर झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण ३.५% घसरण झाली होती. आज तो शेअर भरून निघाला आहे.
कंपनीच्या निकालातील माहितीनुसार, कंपनीच्या कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Operating Revenue) इयर ऑन इयर बेसिसवर, मागील वर्षाच्या तिमाहीतील १५०२ कोटींच्या तुलनेत वाढत १९१७ कोटीवर पहिल्या तिमाहीत पोहोचले. कंपनीच्या महसू लात झालेली वाढ ही प्रामुख्याने सबस्क्रिप्शन बेस मर्चंट मॉडेल आधारित झाल्याचे कंपनीने यावेळी नमूद केले. ईबीटा व करोत्तर नफ्यात झालेल्या वाढीवर भाष्य करताना कंपनीने आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटले,' कंपनीने तिच्या आर्थिक कामगिरीत सुधा रणा नोंदवली, EBITDA ७२ कोटी (४% मार्जिन) आणि करपश्चात नफा (PAT) १२३ कोटींवर पोहोचला. ही सुधारणा एआय-संचलित (AI Driven) ऑपरेशनल कार्यक्षमता (Efficiency), खर्च व्यवस्थापनासाठी,शिस्तबद्ध दृष्टिकोन आणि इतर उत्पन्नात वाढ या मुळे झाली आहे.
निव्वळ पेमेंट उत्पन्न (Net Payment Income) वार्षिक ३८% ने वाढून ५२९ कोटी रुपये झाले असून यामागे दर्जेदार सबस्क्रिप्शन व्यापाऱ्यांची वाढ आणि पेमेंट प्रोसेसिंग मार्जिन्समधील सुधारणा आहे. आर्थिक सेवा उत्पन्न वार्षिक १००% ने वाढून ५६१ कोटी रुप ये झाले असून, व्यापारी कर्ज वितरणातील वाढ, डिफॉल्ट लॉस गॅरंटी पोर्टफोलिओमधून ट्रेल उत्पन्न आणि सुधारलेली वसुली यामुळे हे शक्य झाले.
जून २०२५ पर्यंत सबस्क्रिप्शन व्यापाऱ्यांची संख्या १.३० कोटीच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली. डिव्हाइस व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या वाढीमुळे कंपनीने ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवली आहे आणि डिव्हाइस खर्च कमी करून कॅपेक्समध्ये कपात केली आहे, तसेच वि क्री संघाची उत्पादकता वाढवली आहे. दरम्यान पेटीएम शेअर्समध्ये होत असलेली वाढ ही आजच्या बाजारातील गुंतवणूकदारांच्या कंपनीवर विश्वास वाढल्याने झाल्याचे म्हटले जात आहे.