Sunday, October 26, 2025
Happy Diwali

पुण्यातील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी महापालिकेचे पाऊल

पुण्यातील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी महापालिकेचे पाऊल

पुणे : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार नागरिकांना महापालिकेकडे करता यावी, यासाठी महापालिकेने ‘पीएमसी रोड मित्र ॲप’ तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो थेट महापालिका प्रशासनाला पाठवता येणार आहेत. पुणे शहर खड्डेमुक्त करण्यासाठी हे ॲप तयार करण्यात आले असून, पुढील काही दिवसांतच ते कार्यान्वित केले जाणार आहे.

शहरातील अनेक भागांतील रस्त्यांवर महापालिकेच्या पथ विभागाने दुरुस्तीची कामे केली आहेत. मात्र, त्यानंतरही अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडत असून, खड्ड्यांमसंख्या धील खडी बाहेर येत आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी साठत असल्याने वाहने चालविताना नागरिकांना कसरत करावी लागते.

रस्ते खोदाईनंतर अनेक ठिकाणी डागडुजीचे काम योग्य पद्धतीने न झाल्याने रस्त्यांवर खड्ड्यांची वाढत आहे. महापालिकेच्या पथ विभागकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते. रस्ते खोदाईनंतर महापालिकेने केलेल्या वरवरच्या मलमपट्टीमुळे रस्त्यांवर खड्डे पडत आहेत. याची थेट तक्रार नागरिकांना करता यावी, यासाठी महापालिकेने ‘पीएमसी रोड मित्र ॲप’ तयार केले आहे

Comments
Add Comment