पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवा, भविष्यात उत्तम नियोजन करा

मुंबई : पोस्ट ऑफिसमधील  ही सर्वात सुरक्षित मानली जाते. कारण भारतीय पोस्ट सेवेवर आजही केंद्र सरकारचे १०० टक्के नियंत्रण आहे. इथे तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून काही वर्षांनी चांगला परतावा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये काही अशा योजना आहेत ज्यात गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. गुंतवणुकीवर कोणतीही जोखीम नसते आणि परतावाही निश्चित मिळतो.


पोस्ट ऑफिसमध्ये अनेक योजना आहेत. योग्य योजनेत पैशांची गुंतवणूक केली तर भविष्यात एक मोठी रक्कम आपल्याला परतावा स्वरुपात मिळते . पोस्ट ऑफिसमधील रिकरिंग डिपॉझिट योजना या आधारावर आहे. यात प्रत्येक महिन्याला थोडी थोडकी रक्कम जमा केल्यानंतर भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. यामुळे तुम्हाला भविष्यातील मोठ्या खर्चांकरिता , उदा; मुलांचं शिक्षण, लग्न आणि प्रॉपर्टी घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो.



पोस्ट ऑफिसची आरडी योजना नेमकी आहे तरी काय ?


आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट योजना ही बचत योजना आहे. यात प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम तुम्ही गुंतवू शकता. यात व्याजासह रक्कम हळूहळू वाढते. मुदत संपल्यानंतर यातून तुम्हाला एकरकमी पैसे मिळू शकतात. पोस्ट ऑफिस सरकारच्या अधिपत्यात येते. त्यामुळे यात जोखीम खूपच कमी आहे. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने ही गुंतवणूक सुरक्षित ठरू शकते. जर तुम्ही या योजनेत पाच वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये जमा केले तर ६ लाख रुपये जमा होतील . व्याजासह तुम्हाला मॅच्युरिटीवेळी ७ लाख १३ हजार ६५९ रुपये मिळतील. म्हणजेच तु्म्हाला १,१३,६५९ रुपये इतके व्याज मिळेल. या योजनेंतर्गत प्रत्येक तीन महिन्याने व्याजदर चक्रवाढ होते.



किती आहे सध्याचा व्याजदर ?


जुलै ते सप्टेंबर २०२५ या तिमाहीत आरडी योजनेवर ६.७ टक्के व्याज आहे. कदाचित यात वाढ देखील होऊ शकते. कारण सरकार दर तीन महिन्यांनी या दराचा आढावा घेऊन अपडेट करते. ही योजना पाच वर्षांसाठी आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पुढे वाढवू शकता. दुसरीकडे, आरडी खात्यात तुम्ही एका वर्षात १२ हप्ते पूर्ण केले तर तुम्हाला जमा राशीच्या जवळपास ५० टक्के कर्ज मिळू शकते. त्यामुळे गरजेवेळी मदत होऊ शकते. पण कर्जावरील व्याजदर हा आरडीच्या व्याजदरापेक्षा २ टक्के अधिक असतो.


अस्वीकरण : ही संकलित माहिती आहे. 'प्रहार' या माहितीची हमी देत नाही. गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे आहे.
Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या