
प्रतिनिधी: सलग सहावेळा सोन्यात जोरदार वाढ झाल्यानंतर आता दर ओसरले आहेत. घटलेल्या मागणीनंतर व घटलेल्या डॉलरनंतर बाजारातील सोन्याच्या किंमतीवर दबाव पडल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सकाळी डॉलरच्या निर्देशांकात देखील घसरण झाल्याने सोन्याच्या किंमतीत सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली नाही. पर्यायाने रूपयाही वधारल्याने जागतिक पातळीसह भारतातही सोने स्वस्त झाले आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १३६ रूपयांने, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १२५ रूपयाने, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १०२ रूपयांने घट झाल्यानंतर सोने घसरले. यामुळे २४ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर १००९७ रूपये, २२ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर ९२५५ रूपये, १८ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर ७६७३ रूपयावर गेले आहेत.
संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारतीय सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १३६० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १२५० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १०२० रूपयांनी घसरण झाली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याची तोळा किंमत १००९७० रूपये, २२ कॅरेट सोन्याची तोळा किंमत ९२५५० रूपये,१८ कॅरेट सोन्याची तोळा किंमत ७५७३० रूपयावर गेली आहे. आज मुंबई, पुण्यासह भारतांतील प्रमुख शहरातील सरासरी दर २४ कॅरेटसाठी १००९७, २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ९२५५, १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ७६२५ रूपये आहे. आज. सोन्याच्या निर्देशांकात सकाळी घसरण झाली होती तर आज संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात (Gold Futures Index) यामध्ये १.२१% घसरण झाली होती. सोन्याच्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.८७% घसरण झाल्याने प्रति डॉलर दर २३५८.८८ औंसवर गेला आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स ( Multi Commodity Exchange MCX) मध्ये सोन्याच्या दरात संध्याकाळपर्यंत ०.८४% घसरण झाल्याने दरपातळी ९८५८०.०० रूपयांवर गेली आहे.
चांदीतही घसरण !
सलग दोन वेळा वाढवल्यानंतर चांदीचे दरही थंडावले आहेत. सतत वाढत्या मागणीमुळे, महागड्या सोन्याच्या गुंतवणूकीला पर्याय म्हणून चांदीकडे गुंतवणूक म्हणून पाहिले गेल्याने, औद्योगिक वापरात वाढ झाल्याने चांदीही महागली होती आज मात्र युएसमधील अस्थिरतेचा फटका चांदीला बसला. मागणी घटल्याने चांदीचे दरही घटले आहेत. जागतिक चांदीच्या निर्देशांकात सकाळीही घसरण झाली होती ती संध्याकाळपर्यंत आणखी ०.८२% घसरली. भारतीय सराफा बाजारात संकेतस्थळावरील माहितीनुसार, प्रति ग्रॅम चांदीच्या दरात १ रूपयांने व प्रति किलोत हजार रूपयांनी घट झाली आहे. त्यामुळे चांदीचे प्रति ग्रॅम दर ११८ रूपये व प्रति किलो दर ११८००० रूपयांवर गेले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स बाजारात चांदीच्या दरात ०.२६% घसरण झाल्याने दरपातळी ११५३३८.०० रुपयांवर गेली आहे.