दाट धुक्याची सूचना आता तीन दिवस आधीच मिळणार

पुणे : जगातील पहिले फॉग प्रेडिक्शन मॉडेल पुण्यातील आयआयटीएम (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल टेक्नोलॉजी) या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या संस्थेतील हवामान शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. हे मॉडेल ज्या प्रयोग शाळेतून चालणार आहे, त्याचे उद्घाटन केंद्रीय पृथ्वी विमान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी केले.


दाट धुक्यामुळे दर वर्षी देशभरात सुमारे 13 हजार नागरिकांचा मृत्यू होतो. त्यावर उपाय म्हणून हे मॉडेल विकसित करण्यात आले. यावर विकसित केलेल्या रासायनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले.


त्या वेळी डॉ. रविचंद्रन यांनी सांगितले की, सन 2015 मध्ये दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे मॉडेल बसविण्यात आलेत्यावर सतत दहा वर्षे संशोधन केल्याने ते जगातील सर्वोकृष्ट अन् अत्याधुनिक झाले आहे. पहिल्या टप्प्यात देशातील सर्वच विमानतळांवर ते बसवले जाईल, नंतर रेल्वे आणि इतर वाहतुकीसाठी ते सुचवले जाणार आहे.


सामान्य नागरिकांना काही दिवसांत ते मोबाइलवर दिसेल.विमानतळांसह देशातील स्थानिक पातळीवर जर हे मॉडेल बसवायचे असेल, तर किती खर्च येईल, या प्रश्नावर डॉ. रविचंद्रन म्हणाले की, सुमारे 15 ते 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, ही यंत्रणा टप्प्या टप्प्याने सुचवली आहे. यात प्रामुख्याने उत्तर भारतात बसवली जाईल

Comments
Add Comment

लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’ला ब्रेक; ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता

मुख्यमंत्री शनिवारी जाणार नाशिक दौऱ्यावर

नाशिक : अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ३८ वे अधिवेशन शनिवार, दि. २५ ते रविवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आयोजित

ठाणे स्टेशनजवळ पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; 'टकल्या' ऊर्फ नितेश शिंदे नावाच्या सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल, शोध मोहीम सुरू

ठाणे: कर्तव्य बजावत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला आज पहाटेच्या सुमारास ठाणे स्टेशनजवळील परिसरात एका सराईत

'महायुती' सरकारचा मोठा राजकीय 'गेम'; ५४ आमदारांच्या मतदारसंघांसाठी राज्य सरकारचे २७० कोटी

मुंबई: राज्यातील सत्ताधारी 'महायुती' सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एक मोठा राजकीय

तुमच्या खिशातली ५००ची नोट खरी आहे की नकली? हा धक्कादायक प्रकार ऐकून पायाखालची जमीनच सरकेल!

अमरावती: सावधान! तुमच्या हातात येणारी प्रत्येक ५०० रुपयांची नोट खरी आहे की, बनावट? कारण, अमरावती जिल्ह्यात बनावट

पुणे एसटी विभागाची दिवाळी दरम्यान कोटींची कमाई! सणानिमित्त सोडल्या होत्या जादा बस

पुणे: यावर्षी दिवाळीला गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी पुणे एसटी विभागातून दि. १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान जादा बस