
मुंबई: कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' मालिकेत सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. दिग्रसकर कुटुंबात आनंदी आणि विंजे यांचा पुंडलिकला लाच देण्याचा प्रयत्न फसल्याने घरात जोरदार वाद सुरू आहेत. याच वादात आनंदी थेट इंदू आणि व्यंकूवर गंभीर आरोप करते. या आरोपांमुळे भावनिकदृष्ट्या गोंधळलेला आदू, इंद्रायणीसोबत घर सोडून जाण्याचा निर्णय घेतो.
पण, नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर आहे. त्याच रात्री इंदूला एक दृष्टांत येतो, ज्यामुळे तिच्या मनात एकच विचार येतो की घराला आणि कुटुंबाला एकत्र ठेवण्याची जबाबदारी तिचीच आहे. यानंतर इंदू अधूला थांबवून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करते.
या निर्णयामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होईल का? इंदूसमोर उभे असलेले हे आव्हान ती कसे स्वीकारेल? पुंडलिकला ती कसे चोख उत्तर देणार? सुनेचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ती कशा पार पाडणार? हे सर्व जाणून घेण्यासाठी 'इंद्रायणी' दररोज संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर नक्की पहा.
पुंडलिकचे आव्हान स्वीकारल्यानंतर, आदू आणि इंदू यांचा एक सुंदर क्षण प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतो. आदू इंदूला बाहेर घेऊन जातो आणि तिच्यासोबत वेळ घालवतो. हा क्षण त्यांच्यातील शांतता, प्रेम आणि परस्पर आधाराचे प्रतीक आहे.
या आठवड्यापासून इंदूची खरी कसोटी सुरू होणार आहे. दिग्रसकरांच्या गादीवर डोळा ठेवणारा आणि इंदूचा नवरा म्हणजेच आदूचा वारंवार अपमान करणारा पुंडलिक, त्याला इंदू आता सडेतोड उत्तर देण्यास सज्ज झाली आहे.