
Asus VivoBook 14 लॅपटॉप भारतात लॉन्च
मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असूस ने आपला नवीन विवोबुक 14 (X1407QA) लॅपटॉप भारतात लॉन्च केला आहे. या लॅपटॉपमध्ये स्नॅपड्रॅगन चा आधुनिक स्नॅपड्रॅगन एक्स1-26-100 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (एआय ) खास तयार केलेल्या हेक्सागॉन एन-पी-यू सह येतो.या लॅपटॉपची किंमत ₹65,990 असून, तो २२ जुलैपासून फ्लिपकार्ट आणि असूस च्या अधिकृत ई-शॉप वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
वैशिष्ट्ये आणि तपशील:
विवोबुक 14 मध्ये 14-इंचाचा फुल HD+ (1920x1200) आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. 16:10 आस्पेक्ट रेशो, 60Hz रिफ्रेश रेट, आणिटीव्हीव्ही राइनलँड सर्टिफिकेशन यामुळे डोळ्यांवर कमी ताण येतो. हे स्क्रीन 300 निट्स ब्राइटनेस आणि 45% एनटीएससी कलर कव्हरेज देते. त्याचे हिंग 180 अंशांपर्यंत उघडते, ज्यामुळे लॅपटॉप वापरणे अधिक सोयीचे होते.
लॅपटॉपमध्ये क्वालकॉम चा अॅड्रेनो जीपीयू, 16GB LPDDR5x RAM, आणि 512GB PCIe 4.0 NVMe SSD स्टोरेज आहे. व्हिडिओ कॉलसाठी फुल HD IR कॅमेरा, प्रायव्हसी शटर आणि विंडोज हॅलो फेस रिकग्निशन सपोर्ट देण्यात आला आहे.
सुरक्षिततेसाठी यात मायक्रोसॉफ्ट प्लुटॉन सिक्युरिटी चिप दिली आहे. याचे कीबोर्ड असूस एर्गोसेन्स डिझाइनसह येते आणि त्यात खास कोपायलट की देण्यात आली आहे. टचपॅडमध्ये स्मार्ट जेश्चर सपोर्ट आणि नॉइज रिडक्शन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
कनेक्टिव्हिटी आणि बॅटरी:
विवोबुक 14 14 मध्ये Wi-Fi 6E, Bluetooth 5.3, आणि खालील पोर्ट्स आहेत:
2 x USB 3.2 Gen 1 Type-A
2 x USB 4.0 Gen 3 Type-C (पॉवर डिलिव्हरी व डिस्प्ले सपोर्टसह)
1 x HDMI 2.1 TMDS
1 x 3.5mm कॉम्बो ऑडिओ जॅक
लॅपटॉपमध्ये 50Wh बॅटरी असून ती 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या मते, एकदा पूर्ण चार्ज केल्यावर लॅपटॉप २९ तासांपर्यंत चालू शकतो. ध्वनी अनुभवासाठी डॉल्बी अॅटमॉस स्टीरिओ स्पीकर्स देखील आहेत.