Tanushree Dutta Crying Video : 'कुणीतरी मदत करा... नाहीतर खूप उशीर होईल', सुप्रसिद्ध अभिनेत्रीने ढसाढसा रडत व्हिडीओ केला शेअर म्हणाली...

'आशिक बनाया फेम' बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्तानं (Tanushri Dutta) सोशल मीडियावर एक खळबळजनक व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta), जिनं काही दिवसांपूर्वी तिच्यासोबत बॉलिवूडमध्ये (Bollywood News) गैरवर्तन झाल्याचा दावा केलेला. Me Too वर व्यक्त होत, तिनं दिग्गज अभिनेत्याचं नाव घेऊन खळबळजनक आरोप केले होते. पण, सध्या हिच तनुश्री दत्ता मोठ्या कठीण काळातून जात आहे. तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती ढसाढसा रडत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ती सांगतेय की, गेल्या ४-५ वर्षांपासून तिचा स्वतःच्या घरातचं छळ होत आहे. तसेच घरात मानसिक त्रासाला तसेच शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. कंटाळून तिनं पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याबाबत सांगितलं आणि मदतीची मागणी केली. तसेच तिला मदतीची गरज आहे असंसुद्धा तनुश्री दत्ताने म्हटलंय.

व्हिडिओमध्ये काय म्हणाली अभिनेत्री?



तनुश्री दत्तानं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. ती म्हणाली, “मी गेल्या ४-५ वर्षांपासून माझ्या घरातच छळाला सामोरी जात आहे. त्रासून मी पोलिसांना फोन केला आणि पोलीस आले. पोलिसांनी सांगितले की, तुम्ही पोलीस ठाण्यात येऊन प्रकरणाची संपूर्ण माहिती द्या आणि तुमची तक्रार नोंदवा. कदाचित मी उद्या तिथे जाईन कारण माझी तब्येत ठीक नाही. मी खूप काळापासून त्रस्त आहे आणि गेल्या ५ वर्षांपासून हे सगळं सहन करत आहे. माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. मी आजारी आहे, मी काही कामही करू शकत नाही.” मात्र, या संपूर्ण व्हिडीओमध्ये तनुश्रीने कोणाचेही नाव घेतलेले नाही. ती नेमकं कोणाविषयी बोलत आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.


"कुणीतरी माझी मदत करा, नाहीतर खूपच उशीर होईल..."


तनुश्री दत्तानं व्हिडीओमध्ये पुढे म्हटलंय की, "मला खूप त्रास देण्यात आला आहे, गेल्या ४-५ वर्षांत की, माझी तब्येत बिघडली आहे. मी काहीच काम करू शकत नाहीये, माझं संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालंय, मी हाऊस हेल्परही ठेवू शकत नाही... त्या लोकांनी माझ्या घरात एक हाऊस हेल्पर ठेवलेली, तिच्यामुळे मला अत्यंत वाईट अनुभव आलाय. यायचं आणि चोरी करुन निघून जायचं... मला सर्व कामं स्वतःच करावी लागतायत... मी माझ्याच घरात खूपच अडचणींमध्ये सापडली आहे... कृपया कोणीतरी मला मदत करा. खूप उशीर होण्यापूर्वी काहीतरी करा."

तनुश्री दत्ता कोण आहे?


तनुश्री दत्ताने २००४ मध्ये 'फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स'चा किताब जिंकला आणि मिस युनिव्हर्स २००४ मध्ये टॉप १० मध्ये स्थान मिळवलं. ती २००५-२०१० आणि २०१३ या काळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होती.
Comments
Add Comment

Amaal Mallik : अमाल मलिकचा चित्रपट संगीताला तात्पुरता विराम; म्हणाला, ‘आता माझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार’

मुंबई : संगीतकार आणि गायक अमाल मलिकने सध्यापुरता चित्रपटांसाठी नवीन संगीत देण्यापासून दूर राहण्याचा निर्णय

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Shweta Tiwari : श्वेता तिवारी प्रकरणात मोठा ट्विस्ट; ट्रोलर मनसेचा सदस्य नसल्याचं उघड

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीने ऑनलाइन महिलांविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या काही सोशल

Kriti Sanon Rakhi Ad : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीचा वाद चिघळला; सोनू निगमच्या नावाने फेक पोस्ट अन् मोठा ट्विस्ट!

मुंबई : कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. GIVAच्या या

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Sonu Nigam : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीवरून गायक सोनू निगमची सणसणीत ट्विटर पोस्ट, म्हणाला...

मुंबई : अभिनेत्री कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू असलेल्या वादात आता गायक सोनू निगमने (Sonu Nigam) भूमिका