
नाशिक : पूजा खेडकरचे ओबीसी नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. नाशिक जिल्ह्याचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी हा निर्णय दिला. ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच हे प्रमाणपत्र मिळते. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा खेडकरने कागदोपत्री वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपये दाखवले होते. प्रत्यक्षात आई वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीमुळे तिचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त होत होते. यामुळे पूजा खेडकरचे ओबीसी नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र रद्द करण्यात आले.
याआधी वारंवार दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी पूजा आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. आयएसएससाठी खोटी कागदपत्रे सादर करणे तसेच दिशाभूल करणारी माहिती देणे असे गंभीर आरोप पूजावर आहेत. या प्रकरणात पूजा विरोधात न्यायालयात खटला सुरू आहे.