Friday, August 1, 2025

Nitin Gadkari: नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Nitin Gadkari: नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

पुणे:  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना २०२५ चा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार , लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने हा सन्मान प्रदान केला जाईल.


शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या १०५ व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी १०:३० वाजता टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या विशेष सोहळ्यात गडकरींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.  लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती घेतली. यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते आणि या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल.


या सोहळ्यात टिळक महाविद्यालयाच्या कुलगुरू व टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. गीताली टिळक, टिळक महाविद्यालय ट्रस्टच्या आणि टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक, विश्वस्त रामचंद्र नामजोशी, विश्वस्त सरिता साठे हेही उपस्थित राहणार आहेत.



पुरस्काराचे स्वरूप


लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख रक्कम असे स्वरूप आहे. १९८३ पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पहिला पुरस्कार एस.एम. जोशी यांना प्रदान करण्यात आला होता. आजवर अनेक दिग्गजांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Comments
Add Comment