Saturday, August 2, 2025

Infosys Q1 Results: देशातील क्रमांक दोन आयटी कंपनी इन्फोसिसचा निकाल गुंतवणूकदारांना सुखावणारा ! कंपनीच्या नफ्यात 'इतके' टक्के वाढ !

Infosys Q1 Results: देशातील क्रमांक दोन आयटी कंपनी इन्फोसिसचा निकाल गुंतवणूकदारांना सुखावणारा ! कंपनीच्या नफ्यात 'इतके' टक्के वाढ !
प्रतिनिधी: देशातील क्रमांक दोनची आयटी कंपनी इन्फोसिस (Infosys) कंपनीने आपला बहुप्रतिक्षित तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कंपनीच्या नफ्यात ८.७% वाढ झाल्याने नफा ६९२१ को टींवर पोहोचला आहे. काही तज्ञांनी कंपनीच्या तिमाही निकालातपूर्वी कंपनीचा निव्वळ नफा (Net Profit) ६७७८ कोटींवर जाऊ शकतो असे भाकीत केले होते. त्या आकड्याला पार करत कंपनीने ६९२१ कोटींचा नफा मिळवला. कंपनीला आर्थिक वर्ष २०२५ - २०२६ मध्ये १ ते ३% वाढ अपेक्षित आहे असे त्यांनी निकाला दरम्यान म्हटले आहे. कंपनीच्या ऑपरेटिंग मार्जिनही कंपनीने अबाधित राखले आहे जे सध्या २० ते २२% वर कायम आहे. माहितीनुसार कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात या तिमाहीत इयर ऑन इयर बेसि सवर ६.२% वाढ झाल्याने ती ८८०३ कोटींच्या घरात गेली आहे. मुख्यतः कंपनीच्या महसूलात (Revenue) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ७.५% वाढ झाल्याने महसूल ४२२७९ कोटींवर गेला आहे.

निकालाविषयी बोलताना,'पहिल्या तिमाहीतील कामगिरी हे अनेक आघाड्यांवरील आमच्या अढळ लक्षाचे स्पष्ट प्रतिबिंब आहे, ज्यामुळे तिमाहीत २.६ टक्के वाढ, २०.८ टक्के लवचिक मार्जिन आणि वार्षिक उत्पन्नात ८.६ टक्के वाढ झाली आहे. नफा वाढविण्यासा ठी आणि शेअरहोल्डर मूल्य वाढविण्यासाठी धोरणात्मक प्राधान्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आम्ही प्रोजेक्ट मॅक्सिमसचा वापर करत राहतो', असे इन्फोसिसचे सीएफओ जयेश संघराजका म्हणाले आहेत. दरम्यान, त्यांनी कॅश फ्लो (Cash Flow) बाबत बोलता ना म्हटले की,' सलग पाचव्या तिमाहीत रोख प्रवाह (Cash Flow Conversion) १०० टक्क्यांहून अधिक होते. आमच्या सक्रिय हेजिंग धोरणाद्वारे चलनातील अस्थिरतेचा परिणाम प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात आला' असेही संघराजका म्हणाले आहेत.

माहितीनुसार, कंपनीने तिमाहीच्या अखेरीस ७५३३ कोटी रुपयांचा मोफत रोख प्रवाह (Cash Flow) नोंदवला आणि ४५२०४ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि गुंतवणूक ठेवली होती.
Comments
Add Comment