
मँचेस्टर : भारत वि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीचा पहिला दिवस संमिश्र राहिला. पहिल्या दिवशी भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना दिवसअखेर ४ बाद २६४ धावा केल्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत शार्दूल ठाकूर आणि रवींद्र जडेजा दोघेही १९ धावांवर खेळत आहेत.
या सामन्यात इंग्लडने ट़ॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. बेन स्टोक्सने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या दिवशीला भारताला झटका बसला तो ऋषभ पंतच्या रूपात. ऋषभ पंतला या सामन्यात दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले.
पाच सामन्यांच्या मालिकेत भारत १-२ अशा पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेत टिकून राहायचे असेल तर भारताला हा सामना काही करून जिंकावाच लागेल.