Sunday, October 19, 2025
Happy Diwali

वसईच्या कळंब समुद्र किनारी आढळला संशयास्पद कंटेनर; पोलिसांकडून तपास सुरू

वसईच्या कळंब समुद्र किनारी आढळला संशयास्पद कंटेनर; पोलिसांकडून तपास सुरू

नालासोपारा: वसई पश्चिमेच्या कळंब समुद्र किनारी एक संशयास्पद कंटेनर वाहून आल्याचे आढळून आला आहे. मंगळवारी सकाळी समुद्र किनारी गेलेल्या नागरिकांना बेवारस स्थितीत समुद्राच्या लाटांत घंटागळ्या खात असलेला हा कंटनेर दिसून आल्याने हा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांकडून याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

वसई पश्चिमेच्या कळंब समुद्रकिनाऱ्यावर, मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. मंगळवारी सकाळी या समुद्रकिनाऱ्यावर एक मोठा कंटनेर वाहून आल्याचे नागरिकांना दिसून आले. या घटनेमुळे खळबळ उडाली. नागरिकांनी याची माहिती तात्काळ नालासोपारा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

या कंटनेर पाहण्यासाठी नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर गर्दी केली आहे. हा कंटेंनर एखाद्या मालवाहतूक करणाऱ्या जहाजातून पडला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा