
मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची अखेर घसरणीनेच झाली आहे. प्रामुख्याने निर्देशांकात झालेली किरकोळ घसरण केवळ आणि केवळ आशियाई बाजार स्थिर राहिल्याने झाली आहे. निव्वळ स्थिर नाही तर आज सगळ्या क्षेत्रीय निर्देशांकात घट झाले्या घसरणीचा परिपाक म्हणून बाजार लाल रंगात बंद झाला. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स १३.५४ अंकांने घसरत ८२१८६.८१ पातळीवर स्थिरावला होता तर निफ्टी ५० निर्देशांकात २४.५० अंकांची घसरण झाली असून निर्देशांक २५०६६.२० अंकावर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात आज १११.३९ अंकांने घसरला असून बँक निफ्टी निर्देशांकात २९.८० अंकाने घसरत २५०६०.९० पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१३%,०.१७ अंकांने घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६१%,०.३४क% घसरण झाली आहे. आज सर्वात ठळक मुद्दा म्हणजे निर्देशांक समतोल राहण्यामागे अस्थिरतेचा प्रभाव घटवण्यात अनेक दिवसांनी वीआयएक्स अस्थिरता निर्देशांकाला (VIX Volatility Index) यश आले असून तब्बल ४.०१% निर्देशांकात घसरण झाली. ज्यामुळे बाजारातील शेअर्सच्या किंमती स्थिर राहण्यासाठी मदत झाली आहे.
दुसरीकडे निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) यांमध्ये निफ्टी फायनांशियल सर्व्हिसेस (०.०२%) समभाग वगळता इतर एकही निर्देशांकात वाढ झाली नाही. सर्वाधिक घसरण मिडिया (२.२६%), पीएसयु बँक (१.६५%), ऑटो (०.३८%), रिअ ल्टी (०.९२%), हेल्थकेअर (०.६९%) समभागात घसरण झाली आहे. आज क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली तरी निर्देशांकात मात्र वाढ कंपनी विशेष कामगिरीवर आधारित स्थिरता दर्शविली गेली जी आशियाई गुंतवणूकदारांमध्ये वाढलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. आज अनेक ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही वाढ झाली. बँक निर्देशांकात घसरण झाली तरी एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक यांसारख्या हेवीवेट शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजाराला काही प्रमाणात सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली. मात्र रिलाय न्स इंडस्ट्रीज, ॲक्सिस बँक यांसारख्या शेअर्समध्ये घट झाल्याने बाजाराने एका मर्यादेहून अधिक वाढ नोंदवली नाही. त्यामुळेच आज बाजार ब्रेक इव्हनवर (Break Even Point) वरील किरकोळ खालच्या पातळीवर कायम राहिले आहे.
आज विशेष घडामोड म्हणजे चीनच्या समभागात प्रचंड वाढ झाली आहे. तिबेट डॅम प्रकल्पाला सुरूवात झाल्याने बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावनांना बळ आले या ट्रिगरमुळे चीन बाजारातील समभागात ८ महिन्यातील उच्चांक पातळीवर (All time High) वर गेले आहेत. दुसरीकडे अमेरिकेतील जेरोम पॉवेल यांच्यावरील आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू असला तरी काल अमेरिकेन बाजारात वाढ नोंदवली गेली होती. युएस फेड गव्हर्नर क्रिस्तोफर यांच्या वक्तव्याचा दाखला दिला जात असल्याने व्याजदरात कपा तीची चर्चा वास्तविक नसली तरी जोरात सुरू आहे. आजही सुरूवातीच्या कलात अमेरिकेतील तिन्ही बाजारात वाढ झाली आहे. डाऊ जोन्स (०.०९%), एस अँड पी ५०० (०.१४%), नासडाक (०.३८%) बाजारात वाढ झाली आहे.
अमेरिकेच्या अतिरिक्त टेरिफ विरोधात युरोपियन युनियन एकत्र होत त्यांनी आज यांचा निषेध करत पहिल्यांदाच 'Anti Coercion Instrument ' ठराव आणायचे ठरवले आहे. आपल्यावरील अतिरिक्त ३०% टेरिफ लावण्याच्या निषेधार्थ व्यापारांना एकत्र करण्या ची तयारी केली जात आहे. आज युरोपियन बाजारातीलही सुरूवातीच्या कलात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. युरोपियन बाजारात या ठरावाच्या पार्श्र्वभूमीवर युरोपियन युनियन अमेरिकन पुरवठादारांना युरोपियन युनियन बाजारपेठेत प्रवेश प्रतिबंधित करण्याची शक्यता आहे त्यांना ब्लॉकमधील सार्वजनिक निविदांमध्ये सहभागी होण्यापासून वगळू शकते, तसेच वस्तू आणि सेवांवर निर्यात आणि आयात निर्बंध आणि प्रदेशात थेट परकीय गुंतवणुकीवर मर्यादा घालू शकते. युरोप बाजारात आज सुरूवातीला सीएससी (०.५५ %), डीएएक्स (०.८३%) बाजारात वाढ झाली आहे तर एफटीएसई (०.०८%) बाजारात नुकसान झाले आहे. आशियाई बाजारातील आज संध्याकाळपर्यंत गिफ्ट निफ्टी (०.०२%) सह निकेयी (०.११%), तैवान वेटेड (१.५३%), कोसपी (१.२९%), सेट कंपोझिट (१.३ ७%), जकार्ता कंपोझिट (०.७३%) या बाजारात घसरण झाली. तर शांघाई कंपोझिट (०.६२%), हेगंसेगं (०.५४%), स्ट्रेट टाईम्स (०.०३%) समभागात वाढ झाली आहे.
आज सकाळपर्यंत सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली होती ती परिस्थिती काही अंशी सु़धरल्याने सोन्याच्या दरात स्थिरता येऊ शकते. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या जागतिक निर्देशांकात ०.२७% घसरण झाली आहे. गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.२८% घ सरण झाल्याने दरपातळी प्रति डॉलर ३३८७.४२ औंसवर गेली होती. कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही संध्याकाळपर्यंत ०.७६% घसरण झाली असून Brent Future निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.७५% घसरण झाली आहे. प्रामुख्याने तेलाच्या निर्देशांकात होणारी घसरण प्रामुख्याने पुन्हा एकदा स्पॉट बाजारात घसरलेल्या मागणीमुळे झाली आहे. तज्ञांच्या मते ही घसरण तेलाच्या मुबलकता पातळीत वाढ झाल्याने मात्र मागणी घसरल्याने झाली. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) बाजारातील अनिश्चितचा फटकाही तेलाच्या किंम तीत बसला.
आज सेन्सेक्स निर्देशांकात किरकोळ घसरण झाली असली तरी बीएसईत ४१९८ समभगापैकी १७९० समभागात वाढ झाली असून २२३१ समभागात घसरण झाली. निफ्टीमध्येही घसरण झाली तरी एनएसईत ३१५७ समभागात १४८९ समभागात वाढली झाली असू न १०८१ समभागात घसरण झाली आहे. आज विशेषतः इटर्नल सारख्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास द्विगुणित झाल्याचे चित्र होते. सोमवारी बाजारातील गुंतवणूकदारांपैकी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign Institutional Invest ors FII) पैकी १६८१ कोटींच्या रोख इक्विटी त्यांनी विकल्या असून घरगुती संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Domestic Institutional Investors DII) ने ३५७८ कोटींच्या रोख इक्विटी खरेदी केल्या होत्या. आज परिस्थिती पाहता अमेरिकेतील बाजारात झालेल्या उसळीने अधिक प्रमाणात परदेशी गुंतवणुकदारांनी गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता आहे. एकूणच बाजारातील फंडामेंटल मजबूत असूनही जागतिक बाजारपेठेचा फटका बसण्याची आजही पुनरावृत्ती झाली. सकाळच्या सत्रात झालेली वाढ कालच्या रॅलीनंत र ही आज अखेर घसरणीनेच झाली. त्यामुळे टेरिफ प्रश्नावर बाजारात सावधगिरीने गुंतवणूक केली जात आहे. तिमाही निकालात अनेक कंपन्यांच्या निकालाने निराशा केल्याचा फटकाही बाजारात बसला. आगामी काळात मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये होणारी चढउ तार देखील बाजाराला नवा आकार देऊ शकते.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ इटर्नल (१०.३४%), इंडिया सिमेंट (८.०१%), स्विगी (५.६७%), हिताची एनर्जी (४.४४%), एमआरपीएल (४.०७%), एंजल वन (३.६७%), वन ९७ (३.२८%), डेटा पँटर्न (२.९३%), आयसीआयसीआय बँक (०.५३%), एचडीएफसी बँक (०.३३%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (०.२४%), टेक महिंद्रा (०.२२%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (१.४६%), इंटरग्लोब एव्हिऐशन (१.१९%), अंबुजा सिमेंट (१.१९%), टायटन कंपनी (१.१५%), हिंदाल्को इंडस्ट्रीज (१.०८%), भारत इलेक्ट्रॉनिक्स (०. ७९ %), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (०.४८%), टीसीएस (०.०१%) समभागात वाढ झाली.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण ३६० वन (६.३१%), झी एंटरटेनमेंट (५.६८%), आरती इंडस्ट्रीज (४.२९%), ट्रायडंट (३.७१%), एयु स्मॉल फायनान्स बँक (३.०६%), वोडाफोन आयडिया (३.४१%), वर्धमान टेक्सटाइल (३.२२%), पिरामल फार्मा (३.०२%), सुप्री म इंडस्ट्रीज (२.६७%), टाटा मोटर्स (२.०४%),जिओ फायनांशियल सर्व्हिसेस (२.०३%), आयडीबीआय बँक (१.९९%), अदानी टोटल गॅस (१.६४%), कॅनरा बँक (३.५५%), आयआरएफसी (२.६८%), अदानी ग्रीन एनर्जी (२.२१%), अदानी पोर्टस (२.०५%), इंड सइंड बँक (१.८२%), आयसीआयसीआय प्रोड्यूंशिअल (१.५४%) समभागात घसरण झाली.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,'या २२ जुलै रोजी मंगळवारी झालेल्या सत्रात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने निफ्टी ५० आणि सेन्सेक्समध्ये वाढ आणि तोटा असा चढ-उतार झाला. कोण तेही मज बूत दिशात्मक संकेत न मिळाल्याने, बेंचमार्क निर्देशांक श्वास घेण्यास थांबले, तर वैयक्तिक शेअर्समध्ये लक्षणीय हालचाल दिसून आली. निफ्टी दिवसाच्या शेवटी २९ अंकांनी किंवा ०.१२% ने घसरून २५०६०.९० वर बंद झाला. बाजारातील सहभागींनी भारत अमेरिका व्यापार कराराशी संबंधित घडामोडींवर लक्ष केंद्रित केले. सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले, आयटी, ऑटो, पीएसयू बँका, फार्मा, मीडिया आणि रिअल्टी ०.४% आणि २% च्या दरम्यान घसरले. व्यापक बाजारपेठांमध्येही कमकुवतपणा दिसून आला -निफ्टी मिडकॅप १०० मध्ये ०.६% ची घसरण झाली, तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांकाने थोडी चांगली कामगिरी केली, ०.३% घसरली. दरम्यान, बाजारातील भीती आणि अस्थिरता कमी होत राहिली, जी इंडिया VIX मध्ये ३.५% घसरण १०.७५ वर आली.'
आजच्या निफ्टीतील हालचालीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,'दैनिक चार्टवर, निफ्टीने २० दिवसांच्या EMA पासून कमी प्रतिक्रिया दर्शवत २५२००-२५२५० पातळीच्या आसपास विक्रीचा दबाव दर्शवितो. गेल्या ५ सत्रांमध्ये निर्देशांक २ ४९०० -२५२५० च्या श्रेणीत एकत्रित होताना दिसत आहे. २० दिवसांच्या EMA आणि मागील आठवड्याच्या उच्चांकाचा संगम असल्याने निफ्टी २५२००-२५२५० पातळीच्या आसपास मजबूत अडथळा दर्शवित आहे. अलिकडच्या सुधारात्मक टप्प्याचा संभाव्य शे वट दर्श विण्याकरिता केवळ २५२५० पातळीच्या वर निर्णायक ब्रेकआउट आवश्यक असेल आणि नजीकच्या काळात २५५००-२५६०० च्या पातळीकडे आणखी वरची पातळी उघडू शकेल. नकारात्मक बाजूने, बंद आधारावर २४९०० पातळीच्या खाली ब्रेकडाउ न गेल्या तीन आठवड्यांच्या सुधारात्मक घसरणीचा विस्तार दर्शवेल.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,बँक निफ्टीने गेल्या आठवड्यातील उच्चांक आणि अलीकडील स्विंग हायमधून ट्रेंडलाइन रेझिस्टन्स मिळवलेल्या उच्च पातळीवर नफा बुकिंगचे संकेत देणारी बेअर कॅन्ड ल तयार केली. ५७,३०० पातळीच्या प्रतिकार (रेझिस्टन्स) एरियाच्या वर एक निर्णायक ब्रेकआउट येत्या आठवड्यात ५८,००० पातळीच्या दिशेने आणखी रॅलीसाठी दार उघडेल. नकारात्मक बाजूने, ५६०००-५५७०० झोनमध्ये तात्काळ आधार (Instant Suppo rt) दिसून येतो हा एक महत्त्वाचा क्षेत्र आहे जो मागील अपट्रेंडमधील ५०-दिवसांच्या EMA (Exponential Moving Average EMA) आणि प्रमुख फिबोनाची रिट्रेसमेंट लेव्हलच्या संगमाने (Consolidation) चिन्हांकित केला जातो.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,'बँकिंग शेअर्सच्या काही आकर्षणामुळे बाजाराचे लक्ष तिमाही उत्पन्नावर आहे, जे अलिकडे मंदावले आहे. शुक्रवार आ णि सोमवारी दिसून आलेली सकारात्मकता १ ऑगस्ट रोजी अमेरिकन व्यापार कराराच्या महत्त्वाच्या अंतिम मुदतीपूर्वी कमी झाली. सध्याच्या प्रीमियम मूल्यांकनांना टिकवून ठेवण्यासाठी पहिल्या तिमाहीतील उत्पन्नात वाढ हा महत्त्वाचा मुद्दा असेल. एफआयआय कडून (FIIs) सतत नफा बुकिंग (Profit Booking) केल्याने खाली जाण्याचा दबाव निर्माण होतो, तर डीआयआयकडून स्थिर आवक (Inflow) पहिल्या तिमाहीच्या निकालांकडे आणि व्यापार कराराकडे सकारात्मक पूर्वाग्रहासह श्रेणी-बाउंड हालचालीला (Ra nge bound movement) समर्थन देऊ शकते.'
आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'सोन्याचा भाव एमसीएक्सवर ९९१००–९९४५० पातळीवर आणि कॉमेक्सवर $३३९५–$३३८३ दरम्यान एका अरुंद आणि अस्थिर श्रेणीत व्यवहार झाला, जो व्यापार करार किंवा प्रमुख जागतिक घडामोडींमधून नवीन ट्रिगर्सचा अभाव दर्शवितो. बाजारातील सहभागी धोरणात्मक संकेतांसाठी संध्याकाळी उशिरा फेड चेअर पॉवेल यांच्या भाषणाची वाट पाहत आहेत. पुढे पा हता, यूएस मॅ न्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस पीएमआय डेटा दिशानिर्देशासाठी बारकाईने ट्रॅक केला जाईल. नजीकच्या काळात, एमसीएक्सवर ९८५०० रूपयांवर समर्थन आणि १००५०० च्या जवळ प्रतिकारासह सोन्याचा भाव श्रेणीबद्ध राहण्याची अपेक्षा आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका स्टॉक ब्रोकिंगने म्हटले आहे की,'आज निफ्टी २५,१६६ वर उघडला, २५,१८२ चा उच्चांक गाठला आणि नंतर तो २५,०३५ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. दुपारपर्यंत, निफ्टी २५०८३ च्या आसपास व्यवहार करत होता, जो किरकोळ कमकुवतपणा दर्शवित होता आणि सुरुवातीचा फायदा टिकवून ठेवण्यात अपयशी ठरला. ही हालचाल बाजारातील सावधगिरी दर्शवते, चालू तिमाही निकालातील अस्थिरतेमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी नफा बुक कर ण्याचा पर्याय निवडला. क्षेत्रानुसार, खपात ताकद दिसून आली तर मीडिया, पीएसयू बँक, रिअल्टी, फार्मा, ऑटोमोबाईल्स आणि टेलिकॉमने सापेक्ष कमकुवतपणा दर्शविला. तिमाही कमाईच्या अद्यतनांमुळे बाजारात अस्थिरता दिसून येत आहे परंतु सहभागी कंप नी विशिष्ट आकडेवारीवर प्रतिक्रिया देत असल्याने आणि चालू यूएस व्यापार वाटाघाटींसारख्या जागतिक घटकांकडून पुढील स्पष्टतेची वाट पाहत असल्याने व्यापक भावना संमिश्र राहते. डेरिव्हेटिव्ह्ज फ्रंटवर, अँडव्हान्स-डिकलाइन रेशो मंदीच्या बाजूने वळला होता. ३६० वन, एमजीएल, आयईएक्स, ईटरनल आणि एआरटीआयआयएनडी सारख्या स्टॉकमध्ये ओपन इंटरेस्ट बिल्डअप सर्वाधिक राहिला, ज्यामुळे व्यापारी जवळच्या काळात कुठे कारवाईची अपेक्षा करतात हे स्पष्ट होते.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना चॉईस इक्विटीच ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडचे डेरिएटिव विश्लेषक हार्दिक मतालिया म्हणाले की,'भारतीय शेअर बाजार २२ जुलै रोजी संपूर्ण सत्रात तिरकसपणे व्यवहार केल्यानंतर, स्थिर ते नका रात्मक पात ळीवर बंद झाले. सेन्सेक्स १३.५३ अंकांनी किंवा ०.०२% ने घसरून ८२,१८६.८१ वर बंद झाला, तर निफ्टी २९.८० अंकांनी किंवा ०.१२% ने घसरून २५,०६०.९० वर बंद झाला. बाजाराची रुंदी कमकुवत राहिली, ९८८ समभागांनी प्रगती केली आणि १, ४९२ घसरले, जे दिवसभर श्रेणीबद्ध हालचाली असूनही सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक-आधारित विक्री दबाव दर्शवते.
निफ्टी निर्देशांक गॅप-अप नोटवर उघडला परंतु उच्च पातळी टिकवून ठेवण्यात अयशस्वी झाला, बहुतेक सत्रात नकार आणि बाजूला व्यवहार सहन करावा लागला. दिवसाच्या अखेरीस, तो नकारात्मक नोटवर स्थिरावला. दैनिक चार्टवर, निर्देशांकाने एक मजबूत मंदीची मेणबत्ती तयार केली, जी त्याच्या अल्पकालीन २०-दिवसांच्या EMA कडून नकार दर्शवते, ज्यामुळे विक्रीचा दबाव वाढणे आणि शक्य अल्पकालीन कमकुवतपणा दर्शविला जातो. नकारात्मक बाजूने, २५,००० वर तात्काळ आधार दिसतो, त्यानंतर २४९०० या पातळींपेक्षा कमी झाल्यास आणखी घसरण होऊ शकते. वरच्या बाजूला, तात्काळ प्रतिकार २५२०० वर आहे, त्यानंतर २५३००-२५५०० झोन येतो. तेजीची गती पुन्हा जिवंत करण्यासाठी आणि नवीन खरेदीची आवड आकर्षित करण्यासाठी या प्रतिकार श्रेणी च्या वर एक निर्णायक पाऊल टाकणे आवश्यक आहे. निफ्टी ५० मध्ये टॉप गेनरमध्ये एटरनल, एचडीएफसी लाईफ, टायटन, हिंडाल्को आणि बीईएल होते, तर टॉप गेनरमध्ये श्रीराम फायनान्स, आयशर मोटर्स, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स आणि जिओ फायना न्शियल यांचा समावेश होता.
बँक निफ्टी निर्देशांक नकारात्मक पातळीवर संपला, १९६.७५ अंकांनी किंवा ०.३५% ने घसरला आणि दैनंदिन वेळेत एक मजबूत मंदीचा मेणबत्ती तयार झाला, जो वाढता विक्री दबाव आणि चालू तेजीच्या ट्रेंडमध्ये संभाव्य विराम दर्शवितो. खाली, तात्काळ समर्थ न ५६५०० वर ठेवले आहे, त्यानंतर ५६३००-५६००० श्रेणीत एक मजबूत समर्थन क्षेत्र आहे. या पातळींपेक्षा कमी झाल्यास आणखी कमकुवतपणा येऊ शकतो. वरच्या बाजूला, ५७,००० तात्काळ प्रतिकार आहे, त्यानंतर ५७,२०० येतो. तेजीचा ट्रेंड पुन्हा सुरू होण्या साठी आणि टिकून राहण्यासाठी निर्देशांकाला या प्रतिकार पातळींपेक्षा जास्त धरावे लागेल. असा ब्रेकआउट होईपर्यंत, जवळच्या काळातील ट्रेंड सावध राहतो आणि व्यापाऱ्यांना विक्री-वाढीच्या धोरणासह आणि योग्य जोखीम व्यवस्थापनासह बाजारात येण्याचा सल्ला दिला जातो.
इंडिया VIX ४.०२% ने घसरून १०.७५२५ वर आला, जो कमी अस्थिरता आणि बाजारात स्थिर ते सौम्य सकारात्मक भावना दर्शवितो. डेरिव्हेटिव्ह्जच्या बाबतीत, निफ्टीसाठी सर्वोच्च कॉल ओपन इंटरेस्ट (OI) २५१०० स्ट्राइकवर दिसून येतो, त्यानंतर २५२०० जो या स्तरांवर संभाव्य प्रतिकार दर्शवितो. पुट बाजूला, सर्वोच्च OI २५००० पातळीवर ठेवला जातो, त्यानंतर २४९०० जो मजबूत समर्थन क्षेत्रांवर प्रकाश टाकतो. हा OI सेटअप सूचित करतो की निफ्टीच्या जवळच्या काळातील दिशात्मक हालचालीसाठी २५००० -२५ २०० श्रेणी महत्त्वपूर्ण असेल, व्यापारी या झोनमधून ब्रेकआउट किंवा ब्रेकडाउनवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले की,'रोज अमेरिकन टेरिफचा विषय व त्या संबंधित चर्चा हळूहळू डिस्काउंटेड होत आहेत पण टेरिफ एग्रीमेंट कोणत्या अटी शर्तीनुसार होणार हे पहाणे गरजेचे आहे. या मागील तीन आठवड्यात आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरं जायची तयारी केलेली आहे असं दिसतंय. इकडे अमेरिकेन बाजार ऑल टाईम हायच्या जवळ आहे .पण आपल्या कडील विदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेली विक्री नक्की काय दर्शवत आहेत हेही विचार करायला लावत आहे. बाकी आजचा बाजार फ्लॅट आहे. फार काहीच घडत नाही पुढील महिन्यापासून काय घडते ते पहाणे महत्त्वपूर्ण आहे.'
एकूणच बाजारातील परिस्थिती पाहता गुंतवणूकदारांच्या आशेला टाचणी लागली असली तरी भविष्यात मात्र मजबूत फंडामेंटलचा फायदा गुंतवणूकदारांना होऊ शकतो. तात्पुरती नफा बुकिंगची फेज चालू झाल्यामुळे तसेच जागतिक अस्थिरतेचे नुकसान होत आ हे. मात्र हे बाजाराच्या भविष्यातील तब्येतीसाठी आवश्यक आहे. उद्या युएसमध्ये होत असलेल्या घडामोडीचा परिणाम प्रभावशाली होऊ शकतो. आगामी युएसमधील फेडची वक्तव्ये वगळता ट्रम्प टेरिफ संबंधात मोठा निर्णय घेऊ शकतात. त्यांचे पडसाद बाजारा त अपेक्षित आहे. एकूणच परिस्थिती पाहता निफ्टीतील हालचाली, बँक निफ्टीतील हालचाली, क्षेत्रीय विशेष हालचाली बाजारातील निर्देशांकावला उद्या दिशा देऊ शकतात.