मोहित सोमण: द वेल्थ कंपनीने भारतात प्रथमच नवीन फोर फाईल स्कीम इन्फॉर्मशन (Four Scheme Information SIDs) भारतीय बाजारपेठेत फाईल केले आहेत. स्थापनेनंतर लगेचच कंपनीने फोर स्कीम कागदपत्रे अर्ज करणारी पहिली कंपनी ठरली आहे. गेल्या पाच वर्षांत प्रचंड मोठ्या प्रमाणात म्युचल फंड गुंतवणूकीत प्रचंड वाढ झाली आहे. झालेली वाढ ही विकसित भा रतासाठी योगदान देत असून एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपले विशेष फंड ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांनी काढले आहेत. याच उद्देशाने सर्वात वेगवान वाढणारी दिग्गज कंपनी पांटोमॅथ समुहा शी संलग्न असलेल्या 'द वेल्थ मॅनेजमेंट कंपनी' ने स्थापन झाल्या झाल्याच फोर फाईल स्कीम इन्फॉर्मशन (Four Scheme Information SIDs) फाईल करणारी पहिली भारतीय म्युचल फंड कंपनी ठरली. माहितीनुसार १८ जुलैला कंपनीने हा परवाना नियामकांकडून मिळवला आहे. कंपनीने याविषयी पत्रकार परिषद घेऊन आपल्या नव्या मानकांवर भाष्य केले. या कार्यक्रमात कं पनीचे इतर कार्यकारी मंडळ देखील याक्षणी उपस्थित होते.
कंपनीने विशेष आर्थिक नियोजनाचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. विशेषतः म्युचल फंडाची व्याप्ती एका वर्गापुरती मर्यादित न राहता ती व्याप्ती कश्या पद्धतीने वाढवता येईल यासाठी कंपनीने उपक्रम सुरू केला आहे. उद्दिष्ट आधारित गुणवत्ता असेट व्यवस्थापन साध्य करण्यासाठी कंपनीने एसआयडी (SID) सुरू केले. यासंबंधी माहिती देताना कंपनीने म्हटले होते की, 'वि कसित देशांमध्ये पाहिल्यास जवळपास ५५% फंड हा म्युचल फंडात गुंतवला जातो तो मात्र भारतात केवळ ४ ते ५% आहे. उर्वरित बाजारात खासकरून टिअर १, टिअर २, टिअर ३ शहरात या क्षेत्राविषयी आवश्यक जागृती नाही. मोठी पैसा सोन्यात किंवा बचतीत खितपत पढला आहे ज्याचा अंतिमतः फटका अर्थव्यवस्थेला बसतो व त्याची उत्पादकता कमी होते हे प्रश्न सोडविण्या साठी गुंतवणूकीचे लोकशाहीकरण करण्याचा व्यापक उपक्रम कंपनीने हाती घेतला आहे असे कंपनीने याप्रसंगी म्हटले आहे.
'प्रहार' ने या नव्या कंपनीच्या उपक्रमाबाबत विचारले होते की कशा पद्धतीने या म्युचल फंडासारख्या किचकट विषयाची ओळख सामान्य गुंतवणूकदारांना व्हावी विशेषतः बदलत्या वातावरणा त आर्थिक अस्थिरतेशिवाय सतत बदलत असलेल्या सेबीच्या नियमावली यासंदर्भात कंपनीचे काय नियोजना अथवा योजना (Framework) आहे असे विचारल्यावर कंपनीचे मुख्य रणनीती अधिकारी देबाशिश मोहंती म्हणाले,' आम्ही केवळ गुंतवणूकदारांना वरवरची माहिती किंवा उत्पादनाची माहिती देणार नसून या संबंधी सं पूर्ण प्रक्रियेची माहिती गुंतवणूकदारांना देणार आ होत अशाप्रकारे ही इंडस्ट्री चालते यातल्या जोखीमा अथवा जमेच्या बाजू या सगळ्याची आम्ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
खूप लोकांना प्रश्न पडतो की आमचे पैसे पुन्हा आणि किती मिळतील किती फायदा होईल या सगळ्यासाठी आमच्याकडे व्यापक गुणवत्तात्मक कार्यप्रणाली आहे. आम्ही फंडाचे नियोजन योग्य प्रकारे करणार आहोत ज्याची प्रकिया आम्ही त्यांना सांगणार आहोत अशा पद्धतीने हे गुंतवले जातील ज्यातून जास्तीत जास्त फायदा गुंतवणूकदारांचा होईल या आशयाचे काम आम्ही करतो. त्यामुळेच आम्ही नेहमी सल्ला देतो की कुठलीही गुंतवणूक करताना पहिले तज्ञांचा सल्ला घ्या आणि मग आमच्याकडे गुंतवणूक करू शकता. कारण गुंतवणूकदारांने प्रकिया जाणून घेणे मह त्वाचे असते. म्हणूनच आम्ही रिसर्च बेस प्रकियेला महत्व देतो. गुंतवणूकदारांची गुंतवणूक महत्वाची असल्याने त्यांना आधी माहिती मिळणे गरजेचे आहे आमच्या कंपनीत आम्ही हा उद्देश नेहमी पाळतो.'
'प्रहार' शी कंपनीच्या कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मधू लुनावत म्हणाल्या,' म्हणूनच आम्ही आमच्या सगळ्या भागीदारांना वितरकांना (Distributors) ला उच्च दर्जाचे प्रशिक्षण देणार आहोत. आम्ही बाजारातील अभ्यास केला आहे नेमके गुंतवणूकदार कसा विचार करतात त्यांची मानसिकता कशी असते याचा विचार करूनच आम्ही ट्रेनिंग देणार आ होत. आम्ही केवळ उत्पादनाबाबत त्यांना ट्रेनिंग देणार नसून ग्राहकांची विचारप्रणाली काय असते याबाबतही आम्ही आमच्या प्रशिक्षणात शिकवणार आहोत. ५००० हून अधिक वितरकांना आ म्ही सहा ऑगस्टपासून प्रशिक्षण देणार आहोत ज्याचा अभ्यासक्रम सांगोपांग असेल.'
कंपनीच्या सर्वेसर्वा व मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालिका मधू लुनावत या भारतातील प्रथम महिला आहेत ज्यांनी म्युचल फंड अथवा ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे नेतृत्व करत आहे त. कंपनीने आपल्या क्रमांक दोनच्या वितरक (Distributor) अर्थात म्युचल फंड व्यवस्थापकांना ट्रेनिंग देण्याचे ठरवले आहे. याची संबंधित घोषणा स्वतः लुनावत यांनी केली. भारतातील गुंत वणूक उत्पादकतेत तंत्रज्ञानाचा यशस्वी उपयोग करताना सध्या संपूर्ण भारतात हा समुह विस्तार करत आहे. कंपनीने म्हटले आहे की,'आमच्याकडे अत्यंत तज्ञ व अनुभवी मंडळी संचालक मं डळात आहेत ज्यांचा गुंतवणूक व्यवस्थापन,ऑपरेशन, नियामकता या क्षेत्रातील दांडगा अनुभव असून अशी पारंगत टीम आमच्याकडे आहे '.
सेबी या नियामक मंडळाने १८ जुलै रोजी कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र दिले होते. ज्यामुळे ती नोंदणीकृत मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (एएमसी) म्हणून आपल्या कामकाजाला सुरुवात करण्या साठी तयार झाली आहे. कंपनीने अधिकृत पणे भारताच्या ७४.४१ ट्रिलियन रुपयांच्या म्युचल फंड 'द वेल्थ कंपनी म्हणून बाजारात प्रवेश केला आहे ज्याला पांटोमॅथ समुहाचे पाठबळ आहे. मा हितीनुसार वेल्थ कंपनी म्युचल फंड ही सेबीकडे नोंदणीकृत ४९ वी देशांतर्गत एएमसी (Asset Management Company) असेल. अलीकडेच जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडने ४८ वी एम सी (Asset Management Company) म्हणून कामकाज सुरू केले होते. वेल्थ कंपनी आधीच समूहाच्या कार्यक्षेत्रात सुमारे १०००० कोटी रुपयांच्या क्लायंट मालमत्तेच्या पर्यायी गुंतवणूक (A lternative Investment) क्षेत्रात आहे, चार थीम असलेल्या पर्यायी गुंतवणूक निधी (एआयएफ Alternative Investment Fund) मध्ये'देशभरातील आणि जागतिक बाजारपेठेतील उच्च निव्वळ मूल्य गुंतवणूकदारांना (High Net Worth) सेवा प्रदान करते.
विशेषतः कंपनी आता समाजाच्या सगळ्याच स्तरात कंपनी अंतर्गत म्युचल फंडाचे लोकशाहीकरण करण्यास इच्छुक आहे. या म्युचल फंडांचा लोकशाहीकरणावर पत्रकार परिषदेत सीईओ मधू लुनावत म्हणाल्या आहेत की,' संपत्ती निर्मिती ही केवळ संख्यांबद्दल नाही ती विश्वास, वेळ आणि उत्क्रांतीबद्दल आहे. खूप काळापासून, उच्च-गुंतवणुकीद्वारे उच्च- विश्वास गुंतवणूकीची उपलब्धता होती. 'द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडमध्ये आमचा विश्वास सोपा आहे संस्थात्मक आणि एचएनआय गुंतवणूकदारांचे भविष्य घडवणारे ज्ञान आता प्रत्येक भारतीयाच्या संपत्ती निर्मिती च्या आकांक्षांना पूर्ण करेल' असेल त्या म्हणाल्या आहेत.
यावर भाष्य करताना एसआयडीबद्दल माहिती देताना कंपनीने कंपनीच्या कामकाजावर विस्तृत माहिती दिली. २०१४ साली झालेल्या स्थापनेपासून कंपनीने मुख्य प्रवाहातील कंपनी असा दैदि प्यमान प्रवास केला आहे. कंपनीच्या यशाविषयी कंपनीच्या मुख्य कार्य कारी अधिकारी व कार्यकारी संचालक मधू लुनावत पुढे म्हणाल्या आहेत की,'आमचा प्रवास अनुकरणाने नाही तर हेतूने सुरू होतो - केवळ लोकप्रिय असलेल्या गोष्टींपेक्षा योग्य ते करण्याच्या स्पष्टतेसह. कारण खऱ्या अर्थाने विकसित भारतात, समृद्धी ही सहभागी असणे आवश्यक आहे.'
कंपनीने आपल्या कंपनीची www.wealthcompanyamc.in हे संकेतस्थळ देखील सुरू केले आहे. सेबी रजिस्ट्रर ही कंपनी असून मुंबई येथे स्थित आहे. बाजारातील परिस्थितीचा अंदाज घेत जास्तीत जास्त शक्य तितका परतावा देण्यासाठी कंपनी सज्ज आहे.
बाजारातील माहितीनुसार, एकूणच म्युचल या उद्योगात किरकोळ गुंतवणूकदारांच्या सहभागात वाढ झाली आहे. म्युचल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वा ढत आहे, ज्यामध्ये मुख्य शहरांमध्ये इतर शहरांमध्येही वाढ होत आहेत. फ्रँकलिन टेम्पलटन इंडिया म्युच्युअल फंडच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण म्युच्युअल फंड मालमत्तांम ध्ये (AUM) वैयक्तिक गुंतवणूकदारांचा वाटा आता ६१% पेक्षा जास्त आहे. अहवालानुसार, किरकोळ गुंतवणूकदारांकडून २७.०१% आणि उच्च-निव्वळ-वर्थ व्यक्तींकडून (HNIs) ३३.६७% गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे भारतीय परिपेक्षात वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून म्युचल फंडात गुंतवणूक वाढतच चालली आहे.
नक्की SID म्हणजे काय?
Scheme Information Document (SID) म्हणजे म्युच्युअल फंडांच्या बाबतीत स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (SID) हा एक महत्त्वाचा कागदोपत्री दस्तऐवज आहे जो विशिष्ट म्युचल फंड योजनेबद्दल सर्वसमावेशक तपशील गुंतवणूकदारांना देत फंडाचे उद्दिष्ट, गुंतवणूक धोरणे, जोखीम घटक आणि खर्चाची रचना यासारख्या माहितीचे यात सादरीकरण केलेले असते.