Tuesday, August 12, 2025

Monsoon Update: मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट! येत्या २४ तासांत 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

Monsoon Update: मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट! येत्या २४ तासांत 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

पुणे: गेल्या दोन दिवसापासून मुंबई सह अनेक ठिकाणी  मुसळधार सरी बरसत आहे. पुढील २४ तासांत काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पालघर वगळता संपूर्ण कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला असून, संपूर्ण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.


पावसाची तीव्रता लक्षात घेता मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जोरदार वाऱ्यांसह समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असून, किनारपट्टी भागातील नागरिकांनीही सतर्क राहावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरी पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी विजांचाही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडणे आज टाळा.

Comments
Add Comment