मुंबईचा इतिहास पोहोचवण्यासाठी एमएमआरडीएचे महत्त्वपूर्ण पाऊल

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (अध्यक्ष, एमएमआरडीए) यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नागरिक, अभ्यासक आणि पर्यटकांपर्यंत मुंबईचा समृद्ध आणि अनेक पैलू असलेला इतिहास पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एमएमआरडीएतर्फे चार भागांची हेरिटेज वारसा जपणारी माहितीपुस्तिका ग्रंथमाला प्रकाशित करण्यात आली असून एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते या पुस्तिकांच्या लेखकांच्या उपस्थितीत या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.


एमएमआरडीएच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रकाशित करण्यात आलेल्या या विशेष ग्रंथमालेला एमएमआर हेरिटेज कन्झर्व्हेशन सोसायटीचे (एमएमआर-एचसीएस) आर्थिक सहाय्य लाभले आहे आणि 'द पीपल प्लेस प्रोजेक्ट'तर्फे ही ग्रंथमाला प्रकाशित करण्यात आली आहे.


२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या 'अ वॉक थ्रू मुंबई फोर्ट' या पहिल्या खंडाच्या यशानंतर, या नव्या माहितीपुस्तिका ग्रंथमालेच्या माध्यमातून अभ्यासपुर्ण सखोल लेखन व आकर्षक चित्रांमधून ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध पण काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या परिसरांची माहिती मिळते. मुंबादेवीच्या पवित्र मंदिरांपासून ते वसई-सोपाऱ्याच्या प्राचीन व्यापारी मार्गांपर्यंतच्या क्षेत्रांचा यात समावेश आहे.


एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, "मुंबई महानगर प्रदेशाचा विकास करताना इथला समृद्ध वारसाही लोकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या माहिती पुस्तिकांच्या माध्यमातून नवीन पिढीला मुंबई महानगर प्रदेशाचा वारसा जवळून पाहता येईल. ही ऐतिहासिक ठिकाणे कुठे आहेत, त्यांचे पूर्वी काय महत्त्व होते आणि काळानुसार हा प्रदेश कसा बदलत गेला, हे समजण्यास मदत होईल."

Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

महात्मा फुलेंशी संबंधित फाईल मंत्रालयातून गायब; महसूल मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब