Sunday, October 26, 2025
Happy Diwali

७९९ कोटींच्या निधीतून होणार जिल्हा वार्षिक योजनेची कामे

७९९ कोटींच्या निधीतून होणार जिल्हा वार्षिक योजनेची कामे

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली नियोजन समितीची बैठक

पालघर : आदिवासी घटक कार्यक्रम, सर्वसाधारण व विशेष घटक योजना या तिन्हीही वार्षिक योजनांची कामे करण्यासाठी ७९९ कोटीच्या अर्थसंकल्पाला सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यासोबतच सर्व तालुक्यांना समान निधीचे वितरण करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत.

वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक लोकशाहिर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे पार पाडली.

या बैठकीस आ. पाशा पटेल, खा. सुरेश म्हात्रे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. राजेंद्र गावीत, आ. दौलत दरोडा, आ. शांताराम मोरे, आ. विलास तरे, आ. विनोद निकोले, आ. हरिश्चंद्र भोये, आ. स्नेहा दुबे पंडित, आ. राजन नाईक, तसेच जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधिक्षक यतिश देशमुख, डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, जव्हार प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे आणि जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सर्वप्रथम ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना सन २०२४- २५ च्या अंतिम सुधारित तरतुदीस मान्यता देण्यात आली. सन २०२४- २५ अंतर्गत आदिवासी उपयोजनांतर्गत १ कोटी २१ लाख व सर्वसाधारण अंतर्गत २ कोटी २० लाखांचा निधी तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यार्पित झाला असून उर्वरित निधी संबंधित यंत्रणांना प्रत्यक्ष कामे करण्याकरिता अदा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. सन २०२४- २५ अंतर्गत एकूण ६८८.६० कोटींचा निधी अर्थसंकल्पित झाला असून ६८५.०९ कोटी इतका निधी कार्यान्वयीन यंत्रणांना मंजूर कामाच्या पुर्ततेसाठी अदा करण्यात आला आहे. त्यापैकी ४४४ कोटीची निधी कामे पूर्ण करून प्रत्यक्ष खर्च करण्यात आलेला आहे.

तसेच जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी घटक कार्यक्रम, सर्वसाधारण व विशेष घटक योजना) सन २०२५- २६ अंतर्गत अनुक्रमे ४१०.१३ कोटी, ३७५ कोटी, आणि १४ कोटी असा एकूण ७९९.४३ कोटी निधी अर्थसंकल्पित झाला आहे. तालुक्यातील प्रमुख समस्या लक्षात घेता कामे प्राधान्याने करण्याकरिता पालकमंत्री गणेश नाईक यांनी सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >