Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

दिल्लीत एअर इंडियाच्या विमानाला आग

दिल्लीत एअर इंडियाच्या विमानाला आग

नवी दिल्ली : हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला मंगळवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर उतरताच आग लागली. यामुळे विमानाचे थोडे नुकसान झाले. सुदैवाने सर्व प्रवासी, क्रू आणि वैमानिक सुरक्षित आहेत.

हाँगकाँग - दिल्ली विमान क्रमांक एआय ३१५ दिल्ली विमानतळावर उतरले. विमान उतरले आणि एका सहाय्यक इलेक्ट्रिक युनिट (एपीयू) मध्ये आग लागली. प्रवासी विमानातून उतरत असताना ही घटना घडली. सिस्टम डिझाइननुसार एपीयू आपोआप बंद झाले. पुढील तपासाकरिता आग विझवून विमान विमानतळावर एका बाजूस सुरक्षित ठेवले आहे. तज्ज्ञ तपासणी करुन आग लागण्याचे कारण शोधत आहेत. एअर इंडियाने घटनेची माहिती दिल्ली विमानतळ प्रशासनाला तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला दिली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >