मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने अखेर हिरव्या रंगात केली आहे. आज बाजारात अनेक सत्रानंतर पुन्हा एकदा शेअर बाजार 'बुलिश' पहायला मिळाले आहे. प्रामुख्याने सकाळी अस्थिरतेचे संकेत मिळूनही बँक निर्देशांकाने जोर पकडला होता. त्याचा यथार्थ लाभ शेअर बाजारात झाला आहे. अखेरचे सत्र बंद होताना सेन्सेक्स निर्देशांक ४६२.२१ अंकांने वाढत ८२२१९.९४ पातळीवर स्थिरावला आहे. निफ्टी ५० निर्देशांकात १२२.३० अंकांची वाढ झाल्याने निर्देशांक २५०९०.७० पातळीवर गेला आहे. बाजारात ' कंसोलिडेशन ' झाल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ७९६.८२ अंकाने व बँक निफ्टी ६६९.७५ अंकांने वाढला आहे. सेन्सेक्स मिडकॅपमध्ये ०.५१% वाढ झाली असून स्मॉलकॅपमध्ये मात्र ०.०१% घसरण झाली. निफ्टी मिडकॅपमध्ये ०.६१% वाढ झाली असून स्मॉलकॅपमध्ये (०.०१% घसरण झाली.
आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) बहुतांश समभागात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ खाजगी बँक (१.२६%), रिअल्टी (०.६४%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.५६%), फाय नांशियल सर्व्हिसेस एक्स बँक (०.९७%), मेटल (१.०३%) समभागात झाली आहे. सर्वाधिक घसरण तेल व गॅस (१.०९%), पीएसयु बँक (०.६२%), एफएमसीजी (०.५०%) समभागात झाली.
आज सकाळी वीआयएक्स अस्थिरता निर्देशांक १.५१% वाढला होता जो अखेरच्या सत्रात उलटा प्रवास करत १.६६% घसरला आहे. त्यामुळे आज बाजारात विशेष सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली आहे. काही कमजोर तिमाही निकालामुळे खरं तर बँक निर्देशांकात घसरण होण्याची शक्यता होती मात्र एचडीएफसी सारखा हेवी वेट शेअर २.२५% उसळल्याने बाजाराचे चित्र पालटले गेले दुसरीकडे मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज (३.२४%), विप्रो (२.४७%), एचसीएल टेक्नॉलॉजी (१.१९%), आयसीआयसीआय बँक (२.८१%)सारख्या हेवी वेट शेअरमध्ये घसरण झाल्याने निर्देशांक मर्यादेच्या बाहेर वाढू शकला नाही.
आज बीएसईतील ४३२७ समभगापैकी १९५९ समभागात वाढ झाली आहे तर २१८८ समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे. दुसरीकडे एनएसईत ३०७५ समभागांपैकी १४९२ समभागात वाढ झाली आहे तर १४८४ समभागात घसरण झाली आहे. आज एनएसईत ८७ समभाग (Stocks) अप्पर सर्किटवर राहिले आहेत. तर ७६ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ मस्टेक (७.०७%), इटर्नल (५.६४%), ज्योती सीएनसी (५.३४%), परसिसटंट (४.१७%), युपीएल (३.९२%), एनएमटीसी (३.७९%), टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशन (३.८४%), जिंदाल स्टेन (३.१५%), आयसीआयसीआय बँक (२.८१%), अंबुजा सिमेंट (२.७७%), इन्फोऐज (२.५६%), रेमंड (२.७४%), एचडीएफसी बँक (२.२%), कजारिया सिरॅमिक्स (२.१९%), हिंदुस्थान एरोनॉटिक्स (२.१३%), हिंदुस्थान झिंक (२.१%), पीवीआर आयनॉक्स (१.२८%), बजाज फिनसर्व्ह (१.२%), टीटागर रेल (१.२२%), टाटा मोटर्स (१.०६%),टायटन कंपनी (०.८८%), सीजी पॉवर (१.९५%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (१.७३%), सिमेन्स (०.८४%), अदानी ग्रीन एनर्जी (०.६२%) नेस्ले (१.०२%) समभागात झाली.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण एमआरपीएल (६.७४%), सीएट (५.९२%), एयु फायनान्स (५.२८%), न्यूजेन सॉफ्टवेअर (४.७१%), क्लीन सायन्स (३.२३%), रिलायन्स इंडस्ट्रीज (३.२१%), जि लेट इंडिया (२.७३%), नेटवर्क १८ मिडिया (२.६५%), युनियन बँक (२.६१%), आर आर केबल्स (२.५६%), विप्रो (२.४७%), फिनोलेक्स इंडस्ट्रीज (२.३२%), सफायर फूडस (२.२१%), ब्रेनबीज सोलूशन (२.१७%), कॅनरा बँक (२.११%), पिरामल एंटरप्राईज (१.८८%), ग्लेनमार्क फार्मा (१.८३%), नेटवेब टेक्नॉलॉजी (१.८३%), ओला इलेक्ट्रिक (१.३८%), नुवामा वेल्थ (१.२९%), माझगाव डॉक (१.०२%), एनटीपीसी ग्रीन (१.०२%), अपोलो टायर्स (१.०१%), गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट (१.०१%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (०.९४%), एचबीएल इंजिनिअरिंग (०.९८%), इंद्रप्रस्थ गॅस (०.९३%) कल्पतरू प्रोजेक्ट (०.९८%), बँक ऑफ बडोदा (०.५४%), टाटा कंज्यूमर प्रोडक्ट (०.५१%), ओबेरॉय रिअल्टी (०.०२%) समभागात झाली.
आज विशेष गोष्ट म्हणजे सेबीने जेन स्ट्रीटला पुन्हा बाजारात रिएन्ट्री दिल्याने बीएसईचा शेअर ३% वाढला आहे. सेबीने ४८४४ कोटी दंड भरण्याच्या बदल्यात त्यांना शेअर बाजारात बंदी उठवल्या नंतर बीएसई शेअर वधारला. आशियाई बाजारातील परिस्थितीही आज संमिश्र होती. बँक ऑफ जपानने आकडेवारी कपात केल्याने बाजारात काहीसा उत्साह असला तरी मात्र युएस टेरिफ वाढी वरील अनिश्चिततेचा धसका घेतल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा कायम ठेवला होता. अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी युरोपियन युनियनसोबतच्या संभाव्य कराराबद्दल आशावा द व्यक्त केला होता आणि प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अध्यक्ष ट्रम्प आणि शी यांच्यात ऑक्टोबरपर्यंत बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाँड मार्केटमध्ये, यूएस ट्रेझरी फ्युचर्स स्थिर राहिले आहेत. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स ०.२३%), नासडाक (०.०१%) बाजारात वाढ झाली आहे. तर एस अँड पी ५०० (०.०१%) बाजारात घसरण झाली.
रशियावरील तेलाच्या निर्बंधानंतर रशिया युक्रेन वादाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनीही सुरुवातीच्या कलात नकारात्मक प्रतिसाद दिल्याने युरोपियन तिन्ही बाजारात घसरणीकडे कौल राहिला. ज्यात एफटीएसई (०.८८%), सीएसी (०.८८%), डीएसी (०.११%) बाजारात घसरण झाली.
आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.१५%), स्ट्रेट टाईम्स (०.४२%), हेंगसेंग (०.६२%), कोसपी (०.७१%), सेट कंपोझिट (०.१३%), शांघाई कंपोझिट (०.७१%) बाजारात वाढ झाली आहे. तर तैवान वेटेड (०.३१%) बाजारात घसरण झाली. आज धोरणात्मक पातळीवर चीन मध्ये राजकीय स्थितीत अस्थिरता कायम आहे. जिंगपिंग यांची खुर्ची धोक्यात आल्यानेही बाजारात अस्थिरता आहे. चीन व अमेरिकेतील शीतयुद्ध सुरू असतानाच आता युरोपियन युनियनने रशियन तेलावर लावलेले निर्बंध कसे करतात ते अनिश्चित आहे.
दुसरीकडे युएसमध्ये अस्थिरता असल्याने जगभरातील सोन्याला महत्व प्राप्त झाले. परिणामी सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. प्रामुख्याने प्रत्यक्ष, ईटीएफ सुरक्षित गुंतवणूकीला गुंतवणूक दार प्राधान्य देत असल्याने दरपातळी वाढतच आहे. डॉलर रूपयांच्या तुलनेत सातत्याने वाढत असला तरी अमेरिकेतील अपेक्षित मुल्यांकनाप्रमाणेच वाढला नाही. त्यामुळेच गुंतवणूकदारांना तित कासा दिलासा मिळाला नाही. मात्र फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का याबाबत युएसमध्ये संमिश्र प्रतिसाद कायम राहिल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष १ ऑगस्टपर्यंत टेरिफवर असेल. विशेष तः गुंतवणूकदारांनी कंसोलिडेशन फेजमध्ये मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग केल्याची शक्यता आहे.
सोमवारी कच्च्या तेलाच्या किमती किंचित कमी झाल्या, ब्रेंट तेलाची होल्डिंग ६८.४५ डॉलरच्या आसपास आणि WTI ६६.०० डॉलरच्या आसपास व्यवहार करत होते. युरोपियन युनियनने रशिया विरुद्धच्या निर्बंधांच्या १८ व्या फेरीत फारशी प्रतिक्रिया दाखवली नाही, ज्यामध्ये तिसऱ्या देशांमध्ये रशियन कच्च्या तेलापासून प्रक्रिया केलेल्या रिफाइंड तेल उत्पादनांवर बंदी घालण्यात आली होती.
विश्लेषकांना खात्री नाही की नवीनतम उपाययोजना जागतिक पुरवठ्यात लक्षणीय घट करतील. असे सांगण्यात येत आहे की, निर्बंधांमुळे काही प्रवाहांवर परिणाम होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या जागतिक बाजारपेठेतील WTI Futures निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०८% घसरण झाली असून Brent Future निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.२६% घसरण झाली आहे. सोन्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सोन्याचे दर महागले आहेत.
आज भारतीय बाजारातील अस्थिरता अखेरच्या सत्रात घटली त्यामुळे बाजारात स्थिरता प्राप्त झाली काही प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (FII) पाठिंबा तुलनेने वाढला असला तरी घरगुती गुंतवणूकदारांच्या निश्चित पाठिंब्यावर बाजार वाढले. बँक निर्देशांकानेही अपेक्षेहून अधिक कामगिरी केली. प्रामुख्याने काही अहवालानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा व्याजद रात कपात करू शकते असे भाकीत केल्यानंतर बाजारात आश्वासकता वाढली तसेच एचडीएफसी तिमाही निकालांच्या कामगिरी आधारे बाजारात वाढ झाली आहे. आयटीतील संभाव्य घसरण, मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढत चाललेली अस्थिरता हा देखील चिंतेचा विषय आहे. मागील संपूर्ण आठवड्यात रिअल इस्टेट शेअर्सने चांगली कामगिरी केली तरी आज पुन्हा शेअर्सने घसरण नोंद वली. कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही आज घसरण झाली जी रशियन तेलावर लावलेले निर्बंधांमुळे अनिश्चितता दर्शवते. अनेक सत्रांच्या घसरणीनंतर आज वाढ नोंदविण्यात आल्याने पुन्हा एकदा क्षे त्रीय समभागात लक्ष केंद्रित करणे गुंतवणूकदारांना महत्वाचे ठरणार आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'शनिवार रविवारमध्ये विशेष काही घडामोडीं झाल्या नाहीत त्यामुळेच बाजार स्टेबल ओपन होऊन खाली जाऊन परत व्यवस्थित रिकव्हर झाला. टिपिकल डेरिवेटिव करिताची हालचाल होती. काॅल पूट दोन्हीत कमाई अनेक वेळा अशा हालचाली पहायला मिळतात. जगभरात फारशी काही बातमी नाही हीच चांगली बातमी यानुसार बाजार २५००० पातळीच्या वर बंद झाला आहे. एक उत्तमप्रकारे 'कंसोलीडेशन' होऊन जातयं. हेही बाजारासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेच. २५५०० ते २४५०० या मध्ये बाजार अजून काही महिने रहायलाच पाहिजे तरच नवनवीन उच्चांक पहायला मिळतील. आज अमेरिकेत अनेक कंपन्यांचे रिझल्ट अपेक्षेपेक्षा खुप चांगले आले आहेत विशेषत: फायनान्स व बॅकिंग क्षेत्र यामुळे तिथला बाजार स्थिर आहे. युकेबरोबर फ्री टेरिफ एग्रीमेंट ची सुरुवात होणार अशा बातम्या बाजाराचे मनोधैर्य वाढवत आहेतच.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,'सोमवारी भारतीय बेंचमार्क निर्देशांकांनी जोरदार पुनरागमन केले आणि दोन दिवसांच्या घसरणी च्या मालिकेला ब्रेक लावला. आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक सारख्या बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांमध्ये खरेदीची तीव्र उत्सुकता वाढल्याने सेन्सेक्सने ४०० अंकांपेक्षा जास्त वाढ केली, तर नि फ्टीने २५००० पातळीचा मानसिक टप्पा पुन्हा गाठला. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीने २४८८२ पातळीचा नीचांक गाठला. तथापि, सत्रादरम्यान निर्देशांकात स्थिर सुधारणा दिसली आणि अखेर १२२ अंकांनी किंवा ०.४९% ने वाढून २५०९०.७० पातळीवर दिवसाच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. क्षेत्रीय आघाडीवर, ऑटो, कॅपिटल गुड्स, प्रायव्हेट बँकिंग, पॉवर, रिअल्टी आणि मे टल स्टॉक्समध्ये चांगली कामगिरी दिसून आली - प्रत्येकी ०.५% ते १.३% पर्यंत वाढ झाली. दरम्यान, आयटी, पीएसयू बँका, तेल आणि वायू आणि एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सौम्य नफा बुकिंग झाली, जी ०.४%-१% ने कमी झाली. व्यापक बाजारपेठेत, निफ्टी मिडकॅपने ०.६% वाढीसह चांगली कामगिरी केली, तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक मोठ्या प्रमाणात अपरिवर्तित राहिला, जो व्यापक क्षेत्रात मिश्रित प्रभाव दर्शवितो.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,'दैनिक चार्टवर, निफ्टीने एक तेजीचा कॅंडलस्टिक तयार केला आहे ज्यामध्ये दीर्घ खालच्या सावलीचा समा वेश आहे, जो २४९००-सपोर्ट झोन जवळील खालच्या पातळीवर मजबूत खरेदीची आवड दर्शवितो. सोमवारच्या सत्रात या प्रमुख सपोर्ट क्षेत्राभोवती मागणी वाढली. निर्देशांक येत्या सत्रांमध्ये पुलबॅ क वाढवेल आणि २५२००-२५२५० झोनकडे जाईल - हा प्रदेश २० दिवसांच्या EMA ( Exponential Moving Average EMA) आणि मागील आठवड्याच्या उच्चांकाच्या संगमाने चिन्हांकित आहे. तथापि, २५२५० पातळीवरील निर्णायक ब्रेकआउट अलीकडील सुधारात्मक टप्प्याच्या संभाव्य समाप्तीचे संकेत देण्यासाठी आवश्यक असेल आणि नजीकच्या काळात २५५०० - २५६०० पातळींकडे आणखी वरची पातळी अनलॉक करू शकेल. नकारात्मक बाजूने, २४९०० च्या खाली ब्रेकडाउन सतत कमकुवतपणा दर्शवेल आणि २४६०० पातळीच्या चिन्हाकडे विस्तारित सुधार णा होऊ शकते.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,'बँक निफ्टीने दैनिक चार्टवर एक मजबूत तेजीची मेणबत्ती (Bullish Candle) तयार केली, ज्यामध्ये उच्च आणि उच्च नीचांक दिसून आला, जो अलीकडील दोन सत्रांच्या पुलबॅकनंतर पुन्हा खरेदीची आवड दर्शवितो प्रामुख्याने लार्जकॅप खाजगी क्षेत्रातील बँकांच्या ताकदीमुळे. निर्देशांक २०-दिव सां च्या EMA च्या वर बंद होण्यास देखील यशस्वी झाला, त्याच्या अलीकडील एकत्रीकरण श्रेणीच्या झोनमध्ये पुन्हा प्रवेश केला. पुढे जाऊन, निर्देशांक ५७२५० पातळीकडे त्याची वरची वाटचाल वाढविण्यास सज्ज आहे, जी अलीकडील स्विंग हायमधून काढलेल्या ट्रेंडलाइन प्रतिकाराशी (Resistance) जुळते. या पातळीपेक्षा जास्त निर्णायक ब्रेकआउट ५८००० च्या चिन्हाकडे आणखी रॅली साठी दार उघडेल. नकारात्मक बाजूने, ५६०००- ५५७०० झोनमध्ये तात्काळ आधार (Support Level) दिसून येतो - जो मागील अपट्रेंडमधील ५० दिवसांच्या EMA आणि प्रमुख फिबोनाची रिट्रे समेंट पातळीच्या संगमाने चिन्हांकित केलेला एक महत्त्वाचा क्षेत्र आहे.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने आहे की,'आज निफ्टीमध्ये अत्यंत अस्थिर ट्रेडिंग सत्राचा अनुभव आला. २४९९९ वर उघडताना दोन्ही दिशांनी घसरण झाली, नंतर २४८८२ च्या नीचांकी पातळीवर घसरली आणि नंतर खरेदीच्या तीव्र उत्सुकतेमुळे २५०७९ पातळीच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचली. वित्तीय सेवा, धातू, बँका आणि ऑटोमोबा ईल्स यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्रीय वाढ झाली, ज्यामुळे चक्रीय समभागांमध्ये अंतर्निहित ताकद दिसून आली, तर तेल आणि वायू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि आयटी क्षेत्रे मागे पडली.
अमेरिका आणि भारत यांच्यातील चालू व्यापार वाटाघाटींभोवती सततच्या अनिश्चिततेमुळे एकूण बाजारातील वाढ मंदावली, गुंतवणूकदार पुढील संकेतांसाठी या उच्च-स्तरीय चर्चेच्या निकालांवर बारकाईने लक्ष ठेवून होते. डेरिव्हेटिव्ह्जच्या आघाडीवर, अडव्हान्स-डिकलाइन रेशोने अडव्हान्सिंग स्टॉकला अनुकूलता दर्शविली, जी व्यापक बाजार आशावाद दर्शवते. उल्लेखनीय म्हणजे, आ यईएक्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एयू स्मॉल फायनान्स बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ओपन इंटरेस्टमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली, ज्यामुळे या काउंटरमध्ये वाढलेली क्रियाकलाप आणि गुंतवणूकदारांची अपेक्षा दिसून आली.'
आजच्या बाजारातील एकूणच हालचाली पाहताना आगामी तिमाही निकालासह, क्षेत्रीय निर्देशांकातील परिस्थिती भापल्यास सेन्सेक्स व निफ्टीत उद्याच्या हालचालींचा अंदाज येणे सोपे जाऊ शक ते मात्र उद्या त्याचवेळी जागतिक अस्थिरतेसह बँक निर्देशांक आजप्रमाणेच कामगिरी करेल यावर उद्याची नवी समीकरणे अवलंबून असतील.