Saiyaara Box Office Collection Day 3 : 'सैयारा'चा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ! तिसऱ्या दिवशी बंपर गल्ल्याची कमाई

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेचा (Ananya Pandey) सख्खा भाऊ अहान पांडेनं (Ahaan Pandey) ‘सैय्यारा’ (Saiyaara) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. अहानच्या करिअरमधील पहिल्यावहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वादळचं आणलाय असं म्हणायला हरकत नाही. यामध्ये त्याच्यासोबत अनीत पड्डा या (Anit Padda) अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली आहे. १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या अहान पांडेच्या 'सैयारा' या पदार्पणाच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ₹२१.२५ कोटींचे कलेक्शन केले आहे. ज्यामुळे हा चित्रपट कोणत्याही स्टार किडच्या पदार्पणातील आजपर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी २४ कोटी रुपयांचा बंपर गल्ला कमावलाय. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांच्या कमाईचा आकडा ४५ कोटींवर पोहोचला आहे. ज्या गतीने या चित्रपटाची कमाई सुरू आहे, ते पाहून पहिल्याच वीकेंडच्या कमाईचा आकडा ७५ कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे.





'सैयारा'नं तिसऱ्या दिवशी किती कमाई केली?



मोठ्या मोठ्या सुपरस्टारच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर जे करता आलं नाही, ते 'सैयारा' चित्रपटानं केलं. नवखे सिनेस्टार्स असूनही विक्की कौशलच्या सुपरहिट 'छावा' नंतर, हा चित्रपट २०२५ मध्ये तिकीट खिडकीवर धुमाकूळ घालणारा दुसरा चित्रपट आहे. तसेच, या चित्रपटाचं दिग्दर्शन यशराज फिल्म्स निर्मित आणि मोहित सुरी यांनी केलेलं असल्यानं, त्याबद्दल आधीच चर्चा होती.




  • सैयारा'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी २१ कोटींचा व्यवसाय केला.

  • दुसऱ्या दिवशी, चित्रपटाने १९.०५ टक्के वाढ दाखवली आणि २५ कोटींची कमाई केली.

  • त्याच वेळी, सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सैयारा'नं रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच, रविवारी ३७ कोटींची कमाई केली आहे,
    यासह, 'सैयारा'नं तीन दिवसांत ८३ कोटींची कमाई केली.


‘सैय्यारा’ने पहिल्या २ दिवसांत या चित्रपटांची केली बत्ती गुल



  • 'दृश्यम २'नं तिसऱ्या दिवशी २७.१७ कोटी रुपये कमावले.

  • 'सिंघम अगेन'नं तिसऱ्या दिवशी ३५.७५ कोटी रुपये कमावले.

  • 'भूल भुलैया ३' नं तिसऱ्या दिवशी ३५.५ कोटी रुपये कमावले.

  • 'कबीर सिंग'चा तिसऱ्या दिवसाचा व्यवसाय २७.९१ कोटी रुपये होता.

  • 'मेरे हसबंड की बिवी'नं तिसऱ्या दिवशी १२.२५ कोटी रुपये कमावले

  • 'सितारे जमीन पर'नं तिसऱ्या दिवशी २७ कोटी रुपये कमावले.

  • 'माँ'नं तिसऱ्या दिवशी ३८.५१ कोटी रुपये कमावले.

  • 'कल्की २८९८ एडी'नं तिसऱ्या दिवशी २६ कोटी रुपये कमावले.

  • 'इमर्जन्सी'नं तिसऱ्या दिवशी २०.४८ कोटी रुपये कमावले.

  • 'सैयारा'ची पहिल्या आठवड्यात बजेटपेक्षा जास्त कमाई.

Comments
Add Comment

Lock Upp : 'लॉक अप सीझन २'ची विजेती श्रेया कालराचा मोठा निर्णय; १ कोटींच्या प्राइझ मनीबाबत केली मोठी घोषणा

ओटीटीवरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिॲलिटी शो 'लॉक अप सीझन २'चा नुकताच ग्रँड फिनाले पार पडला आहे. बुधवारी झालेल्या

Saif Ali Khan : ५० व्या वर्षीही अविवाहित असलेली सैफ अली खानची बहीण सबा पटौदीचा लग्नाबद्धल मोठा खुलासा!

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (Saif ali Khan) आणि अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) यांची मोठी बहीण सबा पटौदी (Saba Pataudi) नेहमीच

Amitabh Bachchan : स्पर्धकांशी गप्पा मारताना सांगितले अनेक अनुभव

अमिताभ बच्चन हे एक भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते, दूरदर्शन सूत्रसंचालक, आणि माजी राजकारणी आहेत. ते त्यांच्या

Amitabh Bachchan : "शूट चुकवलं असतं तर माझी..."; KBC साठी सलग २४ तास काम! ८३ व्या वर्षीही अमिताभ बच्चन यांच्या जिद्दीला सलाम

मुंबई : वयाच्या ८३व्या वर्षीही बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा आणि शिस्त

Salman Khan : सलमान खानवर कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप! ‘बीइंग ह्युमन’ ज्वेलरी प्रकरणात कोर्टाचे समन्स; जाणून घ्या ३ कोटींच्या गुंतवणुकीचा वाद नेमका काय?

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे ‘बीइंग ह्युमन’ (Being Human)

Ted Sarandos Meets PM Modi : Netflix ची भारतासाठी मोठी घोषणा! देश बनणार ‘ग्लोबल कंटेंट क्रिएशन हब’; टेड सारंडोस यांनी घेतली PM मोदींची भेट

नवी दिल्ली : भारतातील नेटफ्लिक्सच्या (Netflix) प्रवासाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीचे सह-मुख्य