प्रतिनिधी:मस्टेक (Mastek Limited) या सॉफ्टवेअर कंपनीचा शेअर दिवसाअखेरीस ७.०८% उसळत २६७०.१० रूपये प्रति शेअरवर बंद झाला आहे.शेअर सकाळच्या सत्रात ११.२६% टक्क्या ने उसळला होता. सत्राच्या सुरुवातीला बाजार उघडल्यावरच कंपनीच्या शेअर्सने ९% पेक्षा अधिक उसळत आपली कामगिरी उंचावली आहे. कंपनीच्या सकारात्मक निकालाने ही वाढ मानली जा त आहे. कंपनीने नुकताच आपला तिमाही निकाल जाहीर केला होता. इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कंपनीला पहिल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात २९% वाढ झाल्याने हा भावनात्मक कौल कंपनीला गुंतवणूकदारांकडून मिळाला.
कंपनीच्या शेअर्सनी दोन महिन्यांचा एप्रिलच्या नीचांकी पातळीवरून (All time Low) वरून वाढत ३८ टक्क्यांहून अधिक वधारला आहे . एनएसईतील निफ्टीत या समभागात (Stocks) ६ टक्के वाढ झाली होती, तर या एकूणच वर्षभरात हा शेअर ९% घसरला मास्टेकचे एकूण बाजार भांडवल ८,४२९.६१ कोटीवर पोहोचले आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये १०.०५% वाढ झाल्याने कंपनीचा शेअर २७४४.२० रूपये प्रति शेअरवर पोहोचला होता.
मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७१.५ कोटींचा निव्वळ नफा झाला होता जो या वर्षीच्या तिमाहीत वाढत ९२ कोटीवर पोहोचला आहे. कंपनीच्या करपूर्व कमा ईत (EBITDA) मध्ये मागील वर्षाच्या तिमाहीतील १२३.८ कोटींच्या तुलनेत वाढ होत या तिमाहीत १३७.३ कोटींवर कमाई पोहोचली आहे. मात्र कंपनीच्या ऑपरेटिंग मार्जिनमध्ये गेल्या वर्षीच्या ति माहीतील १५.२% वरून घट होत यंदाच्या तिमाहीत १५.१% घसरण झाली आहे. कंपनीच्या महसूलातही मागील तिमाहीतील १२.५% वाढ झाली आहे. मागील तिमाहीत महसूल ८१२.९ कोटी होता जो वाढत ९१४.७ कोटींवर पोहोचला आहे. यामुळेच कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली आहे.