कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचं विमान रनवेवरून घसरलं! एक मोठा अपघात टळला

मुंबई: मुंबई विमानतळावर एक मोठा विमान अपघात टळला आहे. एअर इंडियाचे कोचीहून निघालेले विमान मुंबई विमानतळावर लँडिंग करत असताना रनवेवरून अचानक घसरले. आज मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडली, यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान एआय २७४४ ए३२० (व्हीटी-टीवायए) हे सोमवारी मुंबई विमानतळावर उतरताना मुसळधार पावसामुळे धावपट्टीवरून भरकटल्याचा प्रकार समोर आला आहे. खराब हवामानामुळे विमान हे धावपट्टीवर उतरल्याबरोबर लगेच घसरले. सुदैवाने यावेळी मोठा अपघात टळला असून दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हि घटना सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. हे विमान उतरत असताना त्याच्या तीन टायरांचा स्फोट झाला, इतकेच नाही तर इंजिनचे देखील नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.


एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सदर घटनेची माहिती देताना सांगितले की, २१ जुलै २०२५ रोजी कोच्चीहून मुंबईला येणाऱ्या फ्लाइट क्रमांक AI2744 चे लँडिंग होत असताना मुसळधार पावसामुळे लँडिंगनंतर विमानाला रनवेवरच चक्कर मारावी लागली. तरीही, विमान सुरक्षितपणे गेटपर्यंत पोहोचवण्यात आले आणि सर्व प्रवासी तसेच चालक दलाचे सदस्य सुरक्षितपणे विमानातून उतरले.



किरकोळ नुकसान


प्रवक्त्यांनी पुढे सांगितले की, मुख्य रनवे ०९/२७ मध्ये किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे, विमानतळावरील कामकाज सुरू ठेवण्यासाठी दुसरा रनवे १४/३२ कार्यान्वित करण्यात आला आहे. CSMIA मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.


 
Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती