Friday, August 15, 2025

पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिलेच्या २० वर्षीय मुलीने संपवलं जीवन, आईसाठी लिहिली सुसाईड नोट

पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिलेच्या २० वर्षीय मुलीने संपवलं जीवन, आईसाठी लिहिली सुसाईड नोट

नाशिक: नाशिकमध्ये पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिलेच्या २० वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना आली आहे. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या पूजा डांबरे या तरुणीने अचानक गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पूजाची आई नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या सुसाईड नोट लिहिली होती, जी पोलिसांना सापडली आहे.

काय आहे आत्महत्येचे कारण?

पूजाने बारावी उत्तीर्ण केली होती आणि ती पदवीचे शिक्षण घेत होती. तिचे आई आणि वडील विभक्त झाले होते, आणि ती आपल्या आईसोबत राहत होती. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे तिला पदवी शिक्षण घेणे अवघड असल्याने पूजा तणावात होती. शिक्षणाचा खर्च टाळण्यासाठी आणि त्यासाठी पोलीस आई उचलत असलेले कष्ट तिला पाहवले नाही. आणि यामुळे तिला टोकाचा निर्णय घेतला. "आई, तुझी कामामुळे खूप धावपळ होते. तुला त्रास द्यायचा नाही. माझ्या शिक्षणाचा खर्च फार आहे. तू टेन्शन घेऊ नको', अशी सुसाईड नोट लिहून पूजाने घरातच मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >