साप्ताहिक राशिभविष्य, २० ते २६ जुलै २०२५

  479

साप्ताहिक राशिभविष्य, २० ते २६ जुलै २०२५






















































आर्थिक स्तर उंचावेल


मेष : या सप्ताहात बाहेर कुठे फिरायला जाण्याचा विचार असल्यास ऑफिसच्या जास्त कामामुळे मनासारखी सुट्टी घालवता येणार नाही. तसेच जेवढे ठरवलेले दिवस सुट्टीचे होते तेवढे मिळणार नाहीत. त्यामुळे मुले नाराज होण्याची शक्यता. नोकरदारांसह व्यावसायिकांना हा सप्ताह चांगला जाणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला निश्चित घेणे आवश्यक. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. सोशल मीडियावर जास्त व्यस्त असू नये. अविवाहित तरुणांचे विवाह ठरण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय करणाऱ्यांना, नवीन करार-मदार होऊ शकतात, त्यात अपेक्षित लाभ होतील. मालमत्तेच्या व्यवहारात आर्थिक लाभ होऊ शकतो.

धनलाभ


वृषभ : या सप्ताहात शेअर बाजार वायदेबाजार तेजी-मंदी इम्पोर्ट एक्सपोर्टमधील व्यक्तींना धनलाभ, आर्थिक प्राप्ती तसेच मोठे सौदे होऊ शकतात. छोट्या-मोठे व्यवसाय करणाऱ्यांचा प्रवास होऊ शकतो. घरातील व्यक्तींशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. मनस्थितीमध्ये बिघाड होऊ शकतो. शांतपणे विचार करून निर्णय घ्या. आपण स्वतः सकारात्मक विचाराने राहा. कुठल्याही प्रकारचा ताण घेऊ नका. सगळे विचारपूर्वक कार्य पूर्ण कराल. मेहनतीचे पूर्ण फळ आपणास मिळणार आहे. परदेशी प्रवास होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये आपण घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. पदोन्नती अथवा वेतन वृद्धि सारख्या घटना घटित होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश संपादित करता येईल.

अपेक्षित यश मिळेल


मिथुन : हा कालावधी आपल्या प्रगतीचा असणार आहे. आपली एनर्जी लेव्हल उच्चप्रतीची असणार आहे. आपल्या पतप्रतिष्ठेमध्ये वृद्धी होऊन मानसन्मान मिळेल. काही नवीन संधी चालून येतील. महत्त्वकांक्षा पूर्ण होताना अनुभवता येईल. योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. जनसंपर्कात वृद्धी होईल. आपणास एखादी चांगली बातमी समजू शकते किंवा खूप दिवसांपासून अडकलेले पैसे आपणास मिळू शकतात. कामाची धावपळ असूनही आपणास उत्साह वाटणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची प्रकृतीमध्ये सुधारणा होणार आहे. सप्ताहाच्या शेवटी आपली काही राहिलेली कामे पूर्ण होतील. निरनिराळ्या मार्गांनी धनलाभ होऊ शकतो.

नवे करार होतील


कर्क : सरकारी नोकरी करणाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांची इच्छित जागी बदली होण्याची शक्यता आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सातत्याने काम कराल. कामाचा ताण येऊ देऊ नका. कामामध्ये अडचणी येण्याची संभावना. आपण आपल्या कुशलतेने अडचणी दूर कराल. वैवाहिक आयुष्यामध्ये विनाकारण ताण येण्याची शक्यता. कुटुंबामध्ये अथवा आपल्या कार्यक्षेत्र लहानसहान गोष्टींवरून वाद-विवाद होण्याची शक्यता. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास कलह सदृश्य प्रसंग घडणार नाहीत. मुलांच्या प्रगतीमुळे आनंदी वातावरण तयार होईल. व्यापार व्यवसायात नवे करार होतील. नोकरीच्या ठिकाणी सहकार्याच्या मताला प्राधान्य देणे हितकारक.

फायद्याचे सौदे हाती येतील


सिंह :आपल्या दैनंदिन जीवनाबरोबर खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. कोणत्याही प्रकारचे अनियमित जेवण करू नका. नोकरी व्यवसायामध्ये लक्ष देणे आवश्यक. वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येईल. पती-पत्नीमधील असलेले मतभेद संपुष्टात येतील. कौटुंबिक सुख मिळेल. आपले लक्ष आपल्या कार्यक्षेत्रावर केंद्रित करा. आर्थिक लाभ मिळवण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटच्या लोकांनासुद्धा हा कालावधी बऱ्यापैकी असेल. विद्यार्थ्यांनी आळस टाकून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश येईल. व्यवसाय धंद्यात फायद्याचे सौदे हाती येतील. उलाढाल वाढेल.

कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी


कन्या : या सप्ताहामध्ये आपली प्रगती करण्यासाठी अनेक संधी मिळणार आहेत. कार्यशील राहणे महत्त्वाचे ठरेल. कलाकारांसह खेळाडूंना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारेल. कोणत्याही प्रकारे चांगली संधी हातातून जाऊ देऊ नका. कुटुंबातील वातावरण अतिशय चांगले असणार आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खूपच व्यस्त राहणार आहात. खूप काम असल्यामुळे थकवा येऊ शकतो. त्यामुळे प्रकृतीची काळजी घ्या. आश्चर्यकारक घटना घडण्याची शक्यता.

 

कामे मार्गी लागतील


तूळ : या सप्ताहामध्ये व्यापार व्यवसायातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. भागीदारीच्या व्यवसायामध्ये भागीदाराबरोबर छोट्या-मोठ्या कारणाने वादावादी होतील. आर्थिक मदतीची गरज भासू शकते. बँकांशी संबंधित कामे होतील. जे व्यावसायिक आयात निर्यातमध्ये आहेत त्यांना परदेशातून कॉन्टॅक्ट मिळण्याची शक्यता आहे. आपण कोणत्याही कामासाठी बाहेर प्रवास करणार असाल तर त्या कामांमध्ये अपेक्षेपेक्षा चांगले फायदे मिळणार आहेत. आपली आर्थिक स्थिती सुधारणार आहे. जास्त काम असल्यामुळे मानसिक शांतता कमीच मिळणार आहे.

कार्यामध्ये सहजतेने यश


वृश्चिक : घरातून आपल्याला काही सुखद अनुभव येण्याची शक्यता आहे. विचारपूर्वक केलेल्या कार्यामध्ये सहजतेने यश येणार आहे. नोकरीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागेल. घरामध्ये मोठी खरेदी होऊ शकते. स्वतःच्या व्यापार व्यवसायासाठी धावपळ करावी लागेल.घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आजारपण समोर येईल, त्यामध्ये आपणास बराच खर्च करावा लागेल. व्यावसायिक परिस्थिती समाधानकारक असेल. काही अचानक खर्च निर्माण होण्याची शक्यता आहे. हे सरकारी कायदेकानून पाळा. तसेच कामगारांविषयीच्या समस्या उदभवू शकतात.

सहकार्य मिळत राहील


धनु : आपणास या सप्ताहामध्ये आई-वडिलांचे सहाय्य मिळणार आहे. या कालावधीमध्ये आपण आपली बचत करू शकता. या बचतीचा भविष्यामध्ये फायदा होणार आहे. भाग्याच्या भरोशावर बसू नका, आपले काम दुप्पटीने वाढवा. कुटुंबामधील काही महत्त्वाच्या प्रश्नांना मुलांमुळे मार्ग मिळतील. घरातील वातावरण चांगले राहील. महत्त्वाचे प्रश्न सुटतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. नोकरीच्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित असलेले सहकार्य मिळत राहील. काही चांगल्या घटना घडू शकतात.

सहकार्य मिळत राहील


मकर : आपणास वडिलांचा सहयोग मिळणार आहे. आपल्या जीवनामध्ये आपण सकारात्मक विचारांना प्राधान्य द्याल. शेअर मार्केट, स्टॉक मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना नवीन गुंतवणूक करताना पूर्ण अभ्यास कराल. आपली दूरदृष्टी विचार व कुशल योजनामुळे आपण आपल्या कार्यक्षेत्रात पुढे जाल. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. कार्यक्षेत्रामध्ये जबाबदारी वाढणार आहे. घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये नूतनीकरण करण्याचा विचार कराल. व्यापार-व्यवसायात गुंतवणूक वाढवावी लागणार. भागीदाराच्या व्यवसायात भागीदाराचे मत विचारात घेणे आवश्यक. काही नवीन संकल्पना किंवा तंत्रज्ञान वापरू शकाल. कुटुंबातील तरुण-तरुणींच्या विवाहातील अडचणी दूर होतील.

धार्मिक यात्रा


कुंभ : व्यापार व्यवसायांमध्ये धैर्याने व समजदारीने घेतलेले निर्णय यश मिळवून देतील. नवीन व्यवसाय किंवा परदेशात गुंतवणूक करायचे ठरवल्यास आपणास चांगले यश येणार आहे. नवीन भागीदारीतील व्यवसाय सुरू करता येईल. व्यावसायिक नवे अनुबंध जुळून येतील. तसेच व्यवसायिक जुनी नाती नव्याने प्रस्थापित होतील. आपल्या स्वतःच्या कार्यकुशलतेमुळे, आपला स्वतःचा विकास होणार आहे. आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या तऱ्हेने पूर्ण कराल. बहीण- भावामधील वाद संपवून चांगले संबंध होतील. कुटुंबीयांसमवेत आपण धार्मिक यात्रा करण्याचा विचार कराल. संपत्तीच्या संदर्भातील रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक फायदा
होऊ शकतो.

जास्त मेहनत घ्याल


मीन : पती-पत्नीच्या नात्यामध्ये दोघे एकमेकांना खूपच समजून घेणार आहात. जीवनामध्ये आनंद प्राप्त होणार आहे. आपल्या स्वतःच्या कार्यक्षमतेमुळे आणि कष्टामुळे नवीन संधी मिळणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना नोकरीमध्ये सातत्याने काम केल्याचे फळ मिळणार आहे. आपल्या कामाचे कौतुक होणार आहे. व्यापार-व्यावसायिकांना नवीन व्यवसाय करण्यासाठी नवीन मार्ग सापडतील. व्यापारवृद्धी करण्यासाठी आपण जास्त मेहनत घ्याल. विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रात अनुकूल वातावरण मिळेल. कुटुंबासह गुरुजनांकडून मार्गदर्शन मिळेल. परदेशगमनाचे स्वप्न साकार होईल. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. नोकरी मिळेल.
Comments
Add Comment

साप्ताहिक राशिभविष्य, ३ ऑगस्ट ९ ऑगस्ट २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ३ ऑगस्ट ९ ऑगस्ट २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, २७ जुलै ते २ ऑगस्ट २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, २७ जुलै ते २ ऑगस्ट २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, १३ जुलै ते १९ जुलै २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, १३ जुलै ते १९ जुलै २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, २२ जून ते २८ जून २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, २२ जून ते २८ जून २०२५

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २९ जून ते ५ जुलै २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, २९ जून ते ५ जुलै २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, २२ जून ते २८ जून २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, २२ जून ते २८ जून २०२५