Friday, August 15, 2025

समुद्र बिलोरी आयना...

समुद्र बिलोरी आयना...
समुद्र बिलोरी आयना
सृष्टीला पांचवा म्हैना

वाकले माडांचे माथे
चांदणे पाण्यात न्हाते
आकाशदिवे लावीत आली कार्तिक नवमीची रैना

कटीस अंजिरी नेसू
गालात मिस्कील हसू
मयूरपंखी मधुरडंखी उडाली गोरटी मैना

लावण्य जातसे ऊतू
वायाच चालला ऋतू
अशाच वेळी गेलीस का तू करून जीवाची दैना...
Comments
Add Comment