आरक्षित प्रवर्गांना ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ नाही

सीईटी कक्षाची विद्यार्थ्यांना सूचना


मुंबई : आरक्षित प्रवर्गांअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या (ईडब्ल्यूएस) आरक्षणातून प्रवेश घेता येणार नाही, अशी सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. तसेच अशा विद्यार्थ्यांनी तक्रार निवारण कालावधीत आपल्या अर्जासोबतच्या कागदपत्रांमध्ये योग्य बदल करावे, असे आवाहनही सीईटी कक्षाने केले आहे.


सध्या अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र प्रवेश नोंदणी प्रक्रियेबरोबरच विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना विद्यार्थी आपल्या प्रवर्गांमधून आरक्षणासाठी अर्ज करतात. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजे, एनटी, इतर मागासवर्गीय, एसईबीसी, एसबीसी अशा प्रवर्गांचा समावेश आहे. त्याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीही आरक्षण असते.


अनेकदा आरक्षित प्रवर्गांमधून अर्ज करणारे विद्यार्थी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करतात. अशा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संबंधित आरक्षित प्रवर्गासाठी तक्रार निवारण कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह अर्जात योग्य बदल करावे, असे सीईटी कक्षाने सूचित केले आहे. अशा अभ्यासक्रमांसाठी नोंदणी कालावधीच्या शेवटच्या तारखेपर्यंत हे बदल करता येतील, असेही जाहीर करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Rain Update: पावसामुळे मोनो रेल बंद पडली, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी हे वाचून घ्या

मुंबई: मुंबई तसेच उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई: मुंबई शहरात आणि उपनगरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता निर्माण

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली