Friday, August 15, 2025

Ratnagiri News: रत्नागिरी येथील आरेवारे समुद्रात ४ पर्यटकांचा बुडून मृत्यू

Ratnagiri News: रत्नागिरी येथील आरेवारे समुद्रात ४ पर्यटकांचा बुडून मृत्यू
रत्नागिरी: आरेवारे समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आरे वारे समुद्रात बुडालेले चारही पर्यटक रत्नागिरी शहरातील ओसवाल नगर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. बुडालेल्या चार पर्यटकांपैकी तीन पर्यटक महिला तर एक पुरुष आहे.

शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ओसवाल नगर येथून आरे वारे समुद्र येथे पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक बुडाल्याची घटना घडली. या चार जणांमध्ये जुनेद बशीर काझी (३० वर्ष), जैनब जुनेद काझी (२८ वर्ष) उजमा समशुद्दीन शेख (१७ वर्ष) उमेरा शमशुद्धीन शेख (१६ वर्ष) बुडालेल्या चार पर्यटकांपैकी दोन पर्यटक हे नुकतेच मुंबई, मुंब्रा येथून आले होते.

या घटनेची माहिती स्थानिक पोलिस पाटील आदेश कदम यांनी ग्रामीण पोलिस निरीक्षक यांना माहिती दिली. मोठ्या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्री बघते यांनी घटनास्थळाला भेट दिली. चारही पर्यटकांना स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

 

 
Comments
Add Comment