आयपीओसाठी मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ४७३ कोटी मुल्यांकनापर्यंत शेअर इश्यू केले जातील. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Inst itutional Buyers QIB) यांच्यासाठी ७५% पर्यंत वाटा गुंतवणूकीस उपलब्ध असेल तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी २५% वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non Institution al Investors NII) यांच्यासाठी उपलब्ध असतील. किरकोळ गुंतवणूकदारांना यात कुठलीही वाटा आरक्षित नसेल.
कंपनीबद्दल -
जून २०२४ साली ही कंपनी स्थापन झाली होती. सेबी रजिस्ट्रर ही कंपनी प्रामुख्याने छोट्या मोठ्या रिअल इस्टेट गुंतवणूकीत कार्यरत आहे. ही एक इन्व्हेसमेंट ट्रस्ट आहे. त्यांनी त्यांची प्रॉपशेअर टि टानिया नावाची गुंतवणूक योजना आणली आहे. कंपनीचा मुख्य व्यवसाय डिंबेचर, सिक्युरिटीज, व इतर वित्तीय गुंतवणूक सेवा देते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील निधीचा वाप र टिटानियाचे शेअर कॅपिटल अधिग्रहण करण्यासाठी, त्यांची दुसरी सबकंपनी टीटानिया एसपीव्हीला कर्ज देण्यासाठी, दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
स्मॉल अँड मीडियम (SM) रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (SM REIT) म्हणजे काय?
SM REIT हे सेबी-नियमित गुंतवणूक साधन आहे जे उत्पन्न देणारे व्यावसायिक आणि निवासी मालमत्ता खरेदी करण्यासाठी निधी एकत्रित करते. ५०-५०० कोटींपर्यंतच्या पोर्टफोलिओसह, हे R EIT युनिटधारकांना तिमाही लाभांश म्हणून भाडे उत्पन्न वितरीत करतात. किमान गुंतवणूक १० लाख आहे, ज्यामुळे जे उच्च जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांसाठीच योग्य आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती -
आर्थिक कामगिरीच्या बाबतीत, गेल्या तीन आर्थिक वर्षात, प्रॉपशेअर टायटानियाने अनुक्रमे एकूण उत्पन्न/निव्वळ नफा ३१.०७ कोटी / ३.५७ कोटी (आर्थिक वर्ष २३), ३४.६७ कोटी / ५.११ कोटी (आर्थिक वर्ष २४), आणि ४०.०७ कोटी /८.९७ कोटी (आर्थिक वर्ष २५) नोंदवला आहे. माहितीनुसार गुंतवणूक व्यवस्थापक कंपनीने ५.३४ कोटी रुपयांच्या एकूण उत्पन्नावर २०.०२ कोटींचा तोटा नोंदवला आहे.
कंपनीने दिलेले नवे लाभांश धोरण:
कंपनीने ऑफर दस्तऐवजाच्या अहवालित कालावधीसाठी कोणताही लाभांश दिलेला नाही. आर्थिक वर्ष २६, आर्थिक वर्ष २७ आणि आर्थिक वर्ष २८ साठी ९% आणि आर्थिक वर्ष २९ साठी ८.७% लाभांश देण्याची योजना आहे.