Monday, August 11, 2025

Central Railway disrupt: ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी

Central Railway disrupt: ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी

गाड्यांना पाच ते सहा तास उशीर


नाशिक: शनिवारी मध्यरात्री देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वायर तुटल्यामुळे मध्य रेल्वेच्या अनेक गा़ड्या पाच ते सहा तास उशिराने धावत आहेत. रेल्वेकडून ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे.

दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज रविवार असल्याकारणामुळे अनेकांना कामाला सुट्टी आहे, त्यामुळे प्रवाशांची गर्दी रेल्वे स्थानकावर होणार नाही असे रेल्वे प्रशासनाला अपेक्षित होते, मात्र, नाशिक रेल्वे स्थानकावर चित्र काही वेगळेच दिसून आले.

मध्य रेल्वेची अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत


शनिवारी मध्यरात्री मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर नाशिक-देवळाली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडली. ज्यामुळे मध्य रेल्वेची अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावात आहेत. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आवश्यक तेवढी माहिती देण्यात येत आहेत. ही घटना घडण्याच्या थोड्यावेळा पूर्वी अस्वली ते पाडळी दरम्यान सुद्धा वायर तुटली होती. ती ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचे पूर्ण झाल्यावर नाशिकरोड जवळ वायर तुटली. रेल्वेच्या तांत्रिक विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून ओव्हरहेड वायर बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

मुंबईत आज मेगाब्लॉक


मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गांवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस ते विद्याविहार हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी ते वांद्रे आणि चुनाभट्टीपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गांवर गोरेगाव ते बोरिवली पर्यत सकाळी १० ते ३ पर्यत मेगाब्लॉक असणार आहे. या दरम्यान रेल्वेकडून तांत्रिक कामे करण्यात येणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >