कवडसा

  34

जीवनगंध : पूनम राणे


खेडेगावातील एक शाळा. सुंदर निसर्गरम्य परिसर. मोकळे मैदान. बाजूलाच उंचच उंच झाडे. एका वर्गात कमीत कमी २० विद्यार्थी. इयत्ता आठवीपर्यंत असलेली ही शाळा.
या शाळेत अभय नावाचा एक विद्यार्थी शिकत होता. त्याचे वडील गावचे सरपंच होते. अभय स्वभावाने अत्यंत प्रेमळ, दयाळू, संवेदनशील मनाचा होता.


वर्ग सुरू होण्यापूर्वी अचानक जोरदार सोसाट्याचा वारा सुटला. या वाऱ्याने झाडाची एक फांदी पडून झाडाच्या फांदीचा एक तुकडा आरपार पत्र्यातून खाली आला आणि पत्र्याला भला मोठा होल पडला. धावपळ सुरू झाली. मात्र कुणाला काहीच इजा झाली नव्हती. शाळेतील शिपायाने पत्र्यात अडकलेली फांदी काढून टाकली.
तो मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा होता.


वर्गात शिक्षिका हजेरी घेत होत्या. नेमकं त्या पडलेल्या होलमधून सूर्यकिरणाचा कवडसा बाईंच्या डोळ्यांवर येत होता. अभयने ते पाहिलं आणि बाई हजेरी घेत असतानाच अभय चपळाईने वर्गाच्या बाहेर पडला. झाडावर चढण्याची कला त्याला अवगत होती. तो सरसर झाडावरून पत्र्यावर चढला आणि आपल्या वहीचा पुठ्ठा फाडून त्याने त्या होलवर ठेवला. बाईना आश्चर्य वाटलं. आपल्या डोळ्यांवर येणारे सूर्याचं किरण आपोआप नाहीसे कसे झाले! म्हणून बाई आजूबाजूला पाहू लागल्या. पाहतात तर अभय जागेवर नव्हता. कोणीतरी वर्गातील विद्यार्थी जोरात ओरडला,“बाई, बाई, अभय पत्र्यावर चढलाय!” मग बाई चपळाईने वर्गाच्या बाहेर आल्या. अभय... अभय... जोराने हाका मारू लागल्या. अभय म्हणाला, “बाई घाबरू नका, मला झाडावर चढण्याची कला अवगत आहे.” मी पडणार नाही. पण बाई म्हणाल्या, “अरे, पण पडला असतास तर... तुला काही लागलं असतं तर...” बाई मला काही होणार नाही. तुमच्या डोळ्यांवर सूर्याचं किरण येत होते, हे मी वर्गात बसून पाहत होतो. त्यामुळे वहीचा पुठ्ठा फाडून मी होलवर ठेवण्यासाठी निघालो.


छोट्याशा वयात अभयला आलेली मोठी समज याचे बाईंना फारच कौतुक वाटले. त्यांना गहिवरून आले. बाईंनी त्याला जवळ घेतले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला व म्हणाल्या, “अभय, मोठेपणी तू नक्कीच इतरांना सावली देणारा होशील.”


अभय शिकून खूप मोठा ऑफिसर झाला. समाजाची सेवा करू लागला. वृद्धांसाठी अनाथाश्रम, वृद्धाश्रमाची व्यवस्था करून त्याच्या उद्घाटनासाठी शाळेतल्या बाईंना बोलावले.
उद्घाटन सोहळ्यानंतर बाईंनी आपल्या भाषणात शाळेतील प्रसंग सर्वांना सांगितला. सर्वांनी जोरजोरात टाळ्या वाजवून अभयचे कौतुक केले. अभयच्या आई-वडिलांना अत्यंत आनंद झाला. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांची छाती अभिमानाने भरून आली. ते अभयला प्रेमाने जवळ घेऊन म्हणाले, “अभय तू आपल्या आई-वडिलांचे व शाळेचे, शाळेतील शिक्षकांचे नाव रोशन केलेस.” आणि असा संस्कारक्षम मुलगा आमच्या पोटी जन्माला आला, हे आम्ही आमचे भाग्य समजतो. या वाक्यामुळे अभय सुखावला. अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा त्याच्या ठाई निर्माण झाली.


तात्पर्य : हेच आपणही अभयसारखी सूक्ष्मनिरीक्षण क्षमता आपल्या अंगी निर्माण करून समाजाचे ऋण फेडले पाहिजेत.

Comments
Add Comment

शहाणपण

जीवनगंध : पूनम राणे दिनेश शाळेतून घरी आल्यापासूनच खूपच नाराज दिसत होता. आई त्याला खोदून खोदून विचारण्याचा

पसायदान

काळोखाच्या गावी, प्रकाशाच्या वाटा : श्रद्धा बेलसरे खारकर आळंदीच्या ‘पसायदान गुरुकुला’तून बाहेर पडताना खूप

सृष्टीची निर्मिती

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ह्मदेवाने आपल्या विविध अंगापासून ऋषींची (मानसपुत्रांची) उत्पत्ती केली.

प्रथा...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर लंडनमध्ये घडलेली एक घटना... मार्गारेट थेंचरबाई पंतप्रधान असताना त्यांनी देशाच्या

‘वो भारत देश है मेरा...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ए न. सी. फिल्म्सचा केदार कपूर दिग्दर्शित ‘सिकंदर-ए-आझम’ हा सिनेमा १९६५ साली आला.

पालकत्व आणि वैवाहिक आयुष्यातील समतोल

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू नवीन पालक होणे हा आनंद, प्रेम आणि नवीन अनुभवांनी भरलेला एक रोमांचक प्रवास असतो. हा