Saturday, August 16, 2025

प्रवासी बोटीला भीषण आग, पाच जणांचा मृत्यू तर अनेक जखमी, कुठे घडली ही घटना?

प्रवासी बोटीला भीषण आग, पाच जणांचा मृत्यू तर अनेक जखमी, कुठे घडली ही घटना?
जकार्ता: इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी येथून एका भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी १.३० वाजता, समुद्राच्या मध्यभागी एका प्रवासी जहाजाला अचानक आग लागली. या अपघातात किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आग लागलेल्या जहाजाचे नाव केएम बार्सिलोना व्हीए फेरी असे असून, हे जहाज इंडोनेशियातील उत्तर सुलावेसी प्रांतातील बेट जिल्हा तलौद येथून प्रांताची राजधानी मनाडो येथे जात होते. यादरम्यान, अचानकच जहाजाला आग लागली. आग लागल्यानंतर संपूर्ण जहाज धुराने भरले आणि काही क्षणातच आगीने संपूर्ण फेरी व्यापली.

प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रात मारल्या उड्या


आगीच्या ज्वाळा पाहून जहाजातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. समुद्राच्या मध्यभागी लागलेल्या या भयानक आगीपासून आपले प्राण वाचवण्यासाठी जहाजातील सर्व प्रवाशांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात उड्या मारल्या. मात्र, या गोंधळात १८ हून अधिक लोक जखमी झाले आहेत, ज्यात महिला आणि अनेक लहान मुलांचा समावेश आहे.

बेपत्ता लोकांचा शोध सुरू





या भयानक अपघातात २८० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे, परंतु यादरम्यान अनेक प्रवासी बेपत्ता देखील झाले आहेत, ज्यांचा शोध सुरू आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये जहाजात उठणाऱ्या ज्वाळा आणि काळा धूर अपघाताची भीषणता स्पष्ट करतो.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा