
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये एकूण ८२ टक्के पाणीसाठा झाला आहे. प्रमुख तलावांमधील एकत्रित पाणी क्षमता १४,४७,३६३ दशलक्ष लिटर आहे. सध्या सर्व तलावांचा एकत्रित उपयुक्त पाणीसाठा ११,८७,८२९ दशलक्ष लिटर आहे. भांडुप कॉम्प्लेक्समधील हायड्रॉलिक इंजिनिअर विभागाच्या आकडेवारीनुसार, २० जुलै २०२४ रोजी सर्व तलावांचा एकत्रित उपयुक्त पाणीसाठा ४०.९६ टक्के होता तो यंदा २० जुलै २०२५ रोजी ८२ टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे.
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल
---
🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today.#MumbaiRains#MyBMCUpdates pic.twitter.com/5KzbgpyPIQ
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 20, 2025
- अप्पर वैतरणा तलावाची क्षमता २,२७,०४७ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,७२,५१७ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.
- मोडकसागर तलावाची क्षमता १,२८,९२५ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,२८,२८३ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.
- तानसा तलावाची क्षमता १,४५,०८० दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,३२,६४४ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.
- मध्य वैतरणा तलावाची क्षमता १,९३,५३० दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १,८१,८०१ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.
- भातसा तलावाची क्षमता ७,१७,०३७ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या ५,५३,६४६ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.
- विहार तलावाची क्षमता २७,६९८ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या १४,५९१ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.
- तुळशी तलावाची क्षमता ८०४६ दशलक्ष लिटर आहे, या तलावात सध्या ४३४६ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.