वणी: दिंडोरी-वणी या राज्यमार्गावर सिड फार्म परिसरात भरधाव वेगातील कारमधील प्रवासी नाशिकला परिचितांचा वाढदिवस साजरा करुन परतत असताना दुचाकी व कारचा अपघात झाला. कारचालकाचे नियंत्रण सुटले व सदर कार स्त्यालगतच्या साचलेल्या नाल्याच्या पाणीत पडली. बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये कारमधील सात लोकांचा पाण्यात बुडून झाला, तर दुचाकीवरील दोघे जखमी झाले होते.
सदर दुर्दैवी अपघातात सात लोकांच्या मृत्यू याप्रकरणी कारचालकावर दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरी पोलिसांनी चौकशी अंती कारचालक याच्या बेदरकारपणामुळे सदर अपघात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. तसेच राँग साईडला जाऊन दुचाकीला धडक देऊन कार नाल्यात पडल्याने सात जण ठार झाल्याची तक्रार दिंडोरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांनी दिल्याने मयत कारचालक दत्तात्रय नामदेव वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.