ओबेन इलेक्ट्रिकच्या संस्थापक आणि सीईओ, मधुमिता अग्रवाल म्हणाल्या, 'रॉर ईझेड ॲमेझॉनवर उपलब्ध करणे हा भारतीय ग्राहकांच्या बदलत्या खरेदी पद्धतींशी जुळवून घेण्याचा एक धोरणात्मक निर्णय आहे. ग्राहक आता मोठ्या खरेदीसाठी अधिकाधिक ऑनलाइन प्लॅटफॉर्मला पसंती देत असल्याने, ई-कॉमर्स आम्हाला त्यांच्यापर्यंत थेट आणि विश्वासार्ह माध्यमातून पोहोचण्याची संधी देते. ' त्या पुढे म्हणाल्या,'ॲमेझॉनवर रॉर ईझेडचे लाँच आमच्या इलेक्ट्रिक वाहन अवलंबनाला अधिक सोयीस्कर आणि व्यापक बनवण्याचा हेतू स्पष्ट करते, विशेषतः ज्या ग्राहकांनी यापूर्वी कधीही इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केलेली नाही.'
हा डिजिटल प्रवेश ओबेन इलेक्ट्रिकच्या व्यापक विस्तार धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या धोरणामुळे कंपनीचे शोरूम नेटवर्क आणि ऑनलाइन उपस्थिती यांचा उत्तम समन्वय साधला जात आहे. ॲमेझॉनसोबतच्या या करारामुळे ओबेन इलेक्ट्रिकला डिजि टल जाणकार, किमतीबद्दल जागरूक आणि सोयीला प्राधान्य देणाऱ्या मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल. याबद्दल अधिक माहिती देताना कंपनीने म्हटले,' सध्या ई-कॉमर्स वाहन विक्री उद्योगात वेगाने बदल घडवून आणत आहे, त्यामुळे हा निर्णय कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.' शहरी रायडर्ससाठी खास डिझाइन केलेलीरॉर ईझेड उच्च कार्यक्षमता, आरामदायी आणि स्टायलिश राइडिंगचा अनुभव देण्यासाठी बनवण्यात आली आहे. ओबेनच्यामालकीच्या एआरएक्स प्लॅटफॉर्मवर आधारित असल्यामुळे मोटरसायकल उत्कृष्ट हाताळणी, मजबूत संरचनात्मक स्थिरता आणि विविध शहरी वातावरणात अधिक चांगला राइड कम्फर्ट देते असा दावा कंपनीने केला आहे.
रॉर ईझेडची वैशिष्ट्ये: (Rorr EZ Specifications)-
९५ किमी/तास इतका सर्वाधिक वेग, फक्त ३.३ सेकंदांत ० ते ४० किमी/तासवेग पकडते, ५२ एनएमचे वर्गातील सर्वोत्तम टॉर्क, आयडीसी-प्रमाणित १७५ किमीपर्यंतची रेंज आणि जलद चार्जिंगलासमर्थनही वैशिष्ट्ये रॉर ईझेडला शहरी प्रवासासाठी एक परिपूर्ण आणि आधुनिक पर्याय बनवतात. कनेक्टिव्हिटी आणि रायडर एड्स देखील आहेत जसे की जिओ-फेन्सिंग, थेफ्ट प्रोटेक्शन, युनिफाइड ब्रेक असिस्ट (यूबीए) आणि ड्राइव्ह असिस्ट सिस्टम (डीएएस)