Jio Financial Services Allianz JV: Jio Financial Services,Allianz कंपन्यांची रिइन्शुरन्ससाठी व्यापक ५०:५० भागीदारी

  58

प्रतिनिधी:जिओ फायनाशिंयल सर्व्हिसेस व अलायन्झ दोन्ही कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत एकत्र येऊन रिइन्शुरन्स लाँच करण्याचे ठरविले आहे. काल दोन्ही कंपन्यांनी तशी अधिकृत घोषणा देखील केली आहे. बिडिंग करार प्रकारच्या एकत्रीकरण पद्धतीने दो न्ही कंपन्यांनी ५०:५० बेसिसवर भारतीय बाजारपेठेत भागीदारी केली आहे. भारतातील ग्राहकांच्या गरजा, स्थानिक पातळीवरील विमा उद्योगातील समीकरणे, जागतिक बाजारपेठेतील तंत्रज्ञान याचा मेळ घालण्यासाठी दोघांनी एकत्र येण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. जिओ फायनाशिंयल सर्व्हिसेस ही भारतातील आघाडीची वित्तीय सेवा (Financial Services) कंपनी आहे. अलायन्झ जगातील सर्वात मोठी वित्तीय व युरोपियन बाजारातील सर्वात मोठी कंपनी आहे. जिओ फायनाशिंयल सर्व्हिसेस (JFSL) व अलायन्झ (Allianz) दोन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे भारतात विमा सेवा पुरवण्यासाठी करारनामा केलेला आहे. अलायन्झ युरोप (BV) ही अलायन्झ समुहाची उपकंपनी (Subsidiary) आहे. या कंपनीने जेएफएसएलशी भागीदारी केली. जिओ भारतातील विमा विशेषता कौशल्य व अलायन्झचे जागतिक पातळीवरील नेटवर्क यांचा एकत्रित परिणाम साधण्यासाठी हा निर्णय दोन्ही कंपन्यांनी घेतला आहे. विमा क्षेत्रातील लेवरेज उत्तमप्रकारे साधण्यासाठी व विमा क्षेत्रातील जोखीम हाताळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या भागीदारीतून भारतीय विमा बाजारातील नव्या विमा उत्पादनांची निर्मिती अपेक्षित आहे. यामधून संशोधन करुन दोन्ही कंपन्या आपल्या जोखीम कमी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. जिओ फायनांशियल सर्व्हिसेस ही तुलनेने नवी असली तरी अलायन्झ भारतात २५ वर्षांपासून कार्यरत आहे. त्यामुळे भारतातील विमा सेक्टरचा दांडगा अनुभव कंपनीच्या पाठीमागे आहे नुकतेच जिओ रिटेलने केल्विनेटर लिमिटेडचे अधिग्रहणानंतर हे भागीदारीचे नवे पाऊल उचलले आहे. जिओ फायनांशियल सर्व्हिसेसने आपला तिमाही निकाल काल उशीरा जाहीर केला ज्यात कंपनीला एकत्रित नफा (Consolidated Profit) इयर ऑन इयर बेसिसवर ३.८% वाढला आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये मागील तिमाहीतील तुलनेत ४६.५८% वाढ झाली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या गैर-कार्यकारी संचालक ईशा अंबानी म्हणाल्या, 'भारत विमा मागणीत परिवर्तनीय वाढ पाहत आहे, जी वाढती समृद्धी, वाढती आर्थिक जागरूकता आणि जलद डिजिटल अवलंबनामुळे चालत आहे. ही भागीदारी, अलायन्झच्या जागतिक पुनर्विमा कौशल्याला जेएफएसएलच्या भारतीय बाजारपेठेची सखोल समज आणि मजबूत डिजिटल पायाभूत सुविधांसह एकत्रित करते, विमा कंपन्यांना नाविन्यपूर्ण आणि सानुकूलित पुनर्विमा उपाय प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते. २०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा या राष्ट्रीय ध्येयाशी सुसंगत, आम्ही एक मजबूत आणि अधिक समावेशक विमा परिसंस्था तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत जी प्रत्येक भारतीयासाठी संरक्षणाची व्यापक उपलब्धता सुनिश्चित करते. या परिवर्तनीय प्रवासाला एकत्रितपणे आकार देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.' अलायन्झने भारताच्या दीर्घकालीन वाढीमध्ये गुंतवणूक सुरू केली आहे. कंपनीचे ध्येय आर्थिक लवचिकता (Flexibility) वाढवणे आणि देशभरातील व्यक्ती, समुदाय आणि व्यवसायांना अधिक सुरक्षितता आणि मानसिक शांती आणणे आहे.अनुकूल लोकसंख्या शास्त्रामुळे भारत आधीच मजबूत आर्थिक वाढीसह जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. देशातील वाढती मध्यमवर्गीयता आणि विमा उपायांची वाढती मागणी दीर्घकालीन मूल्य निर्मितीसाठी एक आकर्षक संधी सादर करते असे कंपनीने म्हटले आहे. अलियान्झ एसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऑलिव्हर बेटे म्हणाले की,'भारतातील लोकांसाठी जागतिक दर्जाच्या वित्तीय सेवांच्या उपलब्धतेच्या लोकशाहीकरणाला पाठिंबा देण्यासाठी, स्वतःसाठी, त्यांच्या कुटुंबांसाठी आणि त्यांच्या व्यवसायांसाठी योग्य संरक्षण शोधणाऱ्या वाढत्या संख्येतील ग्राहकांना सेवा देण्याची संधी देण्यासाठी, जियो फायनान्शियल सर्व्हिसेससोबत भागीदारी करण्याचा आम्हाला अभिमान आहे. अलियान्झ आणि जियो फायनान्शियल सर्व्हिसेस हे ग्राहकांच्या उत्कृष्टतेसाठी ओळखले जाणारे दोन विश्वा सार्ह ब्रँड आहेत आणि आम्ही बदलाच्या या रोमांचक प्रवासात सक्रियपणे योगदान देण्यास आणि सहभागी होण्यास उत्सुक आहोत.' जेएम फायनांशियलने एसबीआयचा जिओ पेमेंट बँक लिमिटेडमधील १४.९६% हिस्साही खरेदी केला होता. ३० जूनला जियो फायनांशियल असेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (Jio BlackRock Asset Management Private Limited) या एकत्रित भागीदारी असलेल्या कंपनीला एनएफओ (New Fund Offer NFO) काढला होता ज्याला तुल्यबळ प्रतिसाद गुंतवणूकदारांनी दिला आहे. अलायन्झ देखील भारतीय बाजारपेठेत आपल्या कंपनीच्या विस्तारासाठी इच्छुक आहे. भारतीय बाजारातील विमा क्षेत्रातील वाढती मागणी असल्याने व जागतिक स्तरावरील भारत चौथी अर्थव्यवस्था झाल्याने अनेक परदेशी कंपन्याही भारतात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत.
Comments
Add Comment

मुंबईत मुसळधार पाऊसामुळे दरड कोसळली, दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी

मुंबई: मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे आज पहाटे शनिवारी (दि. १६ ऑगस्ट) विक्रोळीतील

IIT Hyderabad AI Driverless Bus : भारताचा टेक्नॉलॉजी चमत्कार! IIT हैदराबादमध्ये ड्रायव्हरविना बस, १० हजार प्रवाशांनी घेतला भन्नाट अनुभव

हैदराबाद : हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Hyderabad) ने तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात करत देशातील

Kangana Ranaut : "बाप रे, एकाच खोलीत पाचवेळा… कंगनाचा थरारक खुलासा ऐकून अंगावर शहारे येतील!" नेमकं काय घडलं त्यावेळी?

बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी कंगना राणौत केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच नव्हे, तर स्पष्टवक्तेपणा आणि

Lay off: तीन दिवसात तीन कंपन्यांची कर्मचारी कपातीची घोषणा लवकरच 'या' कंपनीतही १२००० जणांच्या नोकऱ्या जाणार !

मोहित सोमण:आयटीतील एक चिंताजनक बातमी म्हणजे तीन दिवसात तीन कंपन्यांनी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. पहिले

सिनेमाचा निर्मिती खर्च ४०० कोटी, पहिल्या दिवशीची कमाई ५० कोटी, पण दुसऱ्या दिवशी सगळ्यावर पडलं पाणी

मुंबई : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत याचा कुली सिनेमा १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाचा एकूण

Pakistan Cloudburst : पाकिस्तानमध्ये प्रलय! ढगफुटी आणि पुरानं ४१ बळी, ५०० पर्यटक बेपत्ता

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सहा जणांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त मुजफ्फराबाद : पाकिस्तानातील अनेक भागांवर मुसळधार