Thursday, August 14, 2025

Income Tax ITR 2 Fillings : आयकर भरला नाहीत तर हे वाचाच! Income Tax विभागाने ITR 2 सुविधा सुरू केली 'या' दिवशी शेवटची मुदत कसा भराल आयकर जाणून घ्या टप्याटप्याने

Income Tax ITR 2 Fillings : आयकर भरला नाहीत तर हे वाचाच! Income Tax विभागाने ITR 2 सुविधा सुरू केली 'या' दिवशी शेवटची मुदत कसा भराल आयकर जाणून घ्या टप्याटप्याने
प्रतिनिधी: आयकर भरत असलेल्या व्यक्तींसाठी मोठी बातमी आहे. आजपासून इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्यासाठी संकेतस्थळावरील सुविधा सुरू झालेली आहे. ईफायलिं ग सरकारी पोर्टल माध्यमातून करदात्यांना आता आयकर भरता येणार आहे. आयटीआर २ (ITR -2 Filling) ऑनलाईन सुरुवात झाली आहे. आयकर विभागाने नुकतेच म्हटले आहे की,' कर दात्यांनो लक्ष द्या! आयटीआर फॉर्म २ आता ऑनलाईन पद्धतीने प्री फिल (Pre Filled) पद्धतीने भरता येणार आहेत.

इन्कम टॅक्स ई पोर्टल मध्ये जाऊन नागरिकांना आपला कर भरता येणार आहे. आयटीआर २ माध्यमातून नागरिक आपले उत्पन्न आयकर विभागाला जाहीर करू शकतात.

नक्की काय आहे ITR 2 ?

आयटीआर २ हे व्यासपीठ आहे जिथे करदात्यांना कर भरता येणार आहे. आपल्याला मिळत असलेला पगार, कॅपिटल गेन, म्युचल फंड, इतर मिळकत नागरिक या पोर्टलद्वारे नोंदवू शकतात. या त लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे १.२५ लाखांपर्यंत इक्विटी शेअर्स असलेल्या लाभार्थ्यांना व इक्विटी म्युचल फंड ग्राहकांना हा आयटीआर १ भरावा लागणार आहे. तर दुसऱ्या विभागात इतरत्र भांडवली मिळकत (Capital Gain) मिळाल्यास ITR 2 वर कळवावे लागणार आहे. खास गोष्ट म्हणजे उद्योगात मिळणारे उत्पन्न व नफा तोटा यात ग्राह्य धरण्यात येणार नाही. विभागाने म्हटले आहे की, 'आयटी आर १ साठी पात्र नसलेल्या करदात्यांना आयटी आर २ भरावा लागणार आहे.

ज्यांच्या आयटी आर १ मध्ये बसण्याची शक्यता आहे त्यांना आयटी आर २ भरण्याची गरज नाही. कर भरण्यास सरलता यावी आयकर विभागाने संकेतस्थळावर सोयीस्कर बदल केले आहेत. १५ सप्टेंबरमध्ये आरटीआर भरण्याची मुदत वाढवली गजलु आहे.

आयटीआर नक्की कसा भरावा?

1) सर्वप्रथम www.incometax.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. त्यानंतर आपला आयडी पासवर्ड टाकावा

२) आयटीआर फायलिंग सेक्शनमध्ये जा E File वर क्लिक करा मग Income Tax Returns वर जा तिथून File Income Tax Returns मध्ये जावे.

३) आपले संबंधित असेसमेंट वर्ष निवडावे

४) आपला प्रवर्ग निवडावा. हिंदु अनडिवायडेड फॅमिली, स्वतंत्र, किंवा इतर पद्धतीने प्रवर्ग असल्यास तसा पर्याय निवडा

५) योग्य पद्धतीचा पडताळणी करूनच आयकर भरावा. ITR 1 हा चाकरमान्यांना अथवा ITR 2 हा कॅपिटल गेनसाठी, व इतर खाजगी गुंतागुंतीच्या व्यवहारांसाठी असणार आहे. ITR ४ हे उत्पन्नातून नफा व व्यवसायातील मिळकत यावर आधारित असणार आहे.

६) अंतिमतः आयकर भरत असलेल्या व्यक्तील रिटर्न भरताना काय कर भरण्याचे कारण स्पष्ट करावे लागेल

७) थकबाकीच्या काही करासंबंधित माहिती बघायला मिळत असेल तर ते पहिले भरणे आवश्यक ठरणार आहे.

९) पडताळणी - E Verify = आधार ओटीपी, नेट बँकिंग, आयटीआर व्ही या माध्यमातून ही पडताळणी होऊ शकते.

आणखी शेवटी माहिती डाऊनलोड करा. मग पुन्हा रिटर्नर क्लिक करा त्यानंतर आपली माहिती भरा. त्यानंतर आपली आवश्यक माहिती भरा ज्यामध्ये Form 26S ऑटोजनरेट होईल. त्यामध्ये एकदा माहिती आहे का पडताळणी करा.

१०) प्री व्ह्यू अँड व्हॅलिडेट - टॅक्सची आकारणी बरोबर आहे का? आयकरामध्ये जमाखर्च तपासून पहा. अंतिमतः तपासल्यानंतर Final Validate करा व JSON फाईल अपलोड करा

११) अंतिमतः अपलोड - एकदा संकेतस्थळाला भेट द्या. फाईल नाऊ म्हणत योग्य ते असेसमेंट वर्ष निवडावे, फायलिंग टाईप, आयटी आर टाईप सगळ्या गोष्टी योग्य आहेत हे निश्चित केल्यावर JSON File अपलोड करा

१२) इ व्हेरिफिकेशन + ई व्हेरिफिकेशन करण्यापूर्वी आयकर रिटर्न भरल्यानंतर तीस दिवसांच्या आत त्याची उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी चाचपणी केले आवश्यक बदलासह ई व्हेरिफिकेशन पूर्ण करावे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >