
पोस्ट ऑफिस आता आणखी स्मार्ट होणार!
डाक विभागाकडून डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, ‘APT (Advanced Platform for Transformation) अप्लिकेशन’ हे पुढच्या पिढीतील नवीन सॉफ्टवेअर २२ जुलै २०२५ रोजी काही निवडक प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत खालील मुख्य पोस्ट ऑफिस आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सब पोस्ट ऑफिस आणि शाखा पोस्ट ऑफिसमध्ये नव्या प्रणालीची अंमलबजावणी केली जाईल.
या पोस्टऑफिसमध्ये होणार नव्या प्रणालीची अंमलबजावणी
- महिम मुख्य पोस्ट ऑफिस
- ठाणे मुख्य पोस्ट ऑफिस
- श्रीरामपूर मुख्य पोस्ट ऑफिस
- जळगाव मुख्य पोस्ट ऑफिस
- अमरावती मुख्य पोस्ट ऑफिस
- कोल्हापूर मुख्य पोस्ट ऑफिस
सर्व व्यवहार तात्पुरते बंद
नवीन प्रणालीच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी २१ जुलै २०२५ रोजी पोस्ट ऑफिसमधील सर्व व्यवहार तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात डेटा माइग्रेशन, सिस्टीम तपासणी आणि आवश्यक कॉन्फिगरेशनची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

Pankaja Munde : अधिवेशन संपताच पंकजा मुंडे यांनी घेतली कांदळवनाच्या कत्तलीची तात्काळ दखल!
अनधिकृत भराव करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश सभागृहात आमदारांना दिलेला शब्द पाळला मुंबई : अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला ...
APT अप्लिकेशनची वैशिष्ट्ये काय?
- अधिक वेगवान आणि प्रभावी सेवा
- ग्राहकांसाठी वापरायला सुलभ आणि आधुनिक इंटरफेस
- जलद सेवा वितरणाची हमी
- कार्यक्षम, स्मार्ट आणि भविष्योन्मुख पोस्ट सेवा प्रणाली
ग्राहकांना विनंती
सर्व ग्राहकांनी आपल्या पोस्ट ऑफिस भेटीचे नियोजन वेळापत्रकानुसार करावे. दिलगिरी व्यक्त करत आहोत की या प्रक्रियेमुळे थोडा त्रास होऊ शकतो, मात्र या डिजिटल परिवर्तनामुळे भविष्यात आणखी जलद, सुरक्षित आणि सोयीच्या सेवा मिळणार आहेत.