
भाविकांसाठी रेल्वेच्या दोन विशेष गाड्या
पालघर : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी रेल्वेने दोन विशेष गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले आहे. पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर आणि डहाणू रेल्वे स्थानकावर या गाड्यांना थांबा राहणार आहे. त्यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोकणातील गणेश भक्तांच्या सोयीसाठी दोन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. विश्वामित्री-रत्नागिरी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०९११०/०९१०९) ही गाडी पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर आणि वसई येथे थांबणार आहे. ही गाडी ऑगस्ट महिन्यात २३, २७ आणि ३० ऑगस्ट रोजी, तसेच सप्टेंबर महिन्यात ३ आणि ६ सप्टेंबर रोजी रत्नागिरीकडे जाईल. पालघरमध्ये दुपारी २.२० वाजता ही गाडी थांबेल आणि रात्री रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २४ ऑगस्ट, २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी धावेल. रत्नागिरीहून रात्री सुटून पालघरमध्ये सकाळी ११.४८ वाजता पोहोचेल.
तसेच वडोदरा-रत्नागिरी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०९११४/०९११३) ही दुसरी विशेष गाडी २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जाण्यासाठी निघेल. ही गाडी पालघरमध्ये दुपारी ३.३० वाजता थांबेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी रत्नागिरीहून सुटून पालघरमध्ये सकाळी ११.४८ वाजता पोहोचेल.