Thursday, September 18, 2025

भाईजानच्या माजी गर्लफ्रेंडच्या फार्महाऊसमध्ये दरोडा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह अनेक वस्तूची तोडफोड

भाईजानच्या माजी गर्लफ्रेंडच्या फार्महाऊसमध्ये दरोडा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह अनेक वस्तूची तोडफोड

पुणे: चित्रपट अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या पुण्यातील मावळ येथील फार्महाऊसमध्ये चोरी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता बिजलानी सुमारे ४ महिन्यांनंतर तिच्या फार्महाऊसवर गेली होती,  तेव्हा तिला हे कळले की तिथे चोरी झाली आहे.

पवना धरणाजवळील तिकोना गावातील निसर्गरम्य ठिकाणी संगीता बिजलानीचा आलिशान फार्महाऊस आहे. इथे सुट्टीच्या वेळी ती आपल्या कुटुंब तसेच मित्रमैत्रिणीसोबत निवांत वेळ घालवण्यास येत असते. मात्र गेले चार महिने ती या ठिकाणी येऊ शकली नव्हती.

पुणे ग्रामीण पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार संगीता बिजलानी म्हणाल्या की मुख्य दरवाजा आणि खिडकीची ग्रिल तुटलेली आहे, एक टेलिव्हिजन सेट गायब आहे आणि बेड, रेफ्रिजरेटर तसेच सीसीटीव्ही कॅमेरे यासह अनेक घरातील वस्तू तुटलेल्या आहेत.

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी लिहिलेल्या अर्जात संगीता बिजलानीने म्हटले आहे की, वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती फार्महाऊसला भेट देऊ शकली नाही. "आज, मी माझ्या दोन मोलकरणींसह फार्महाऊसला भेट दिली. पोहोचल्यावर, मुख्य दरवाजा तुटलेला पाहून मला धक्काच बसला. आत जाताना मला खिडकीच्या ग्रिल्स तुटल्याचे आढळले,  एक टेलिव्हिजन सेट गायब होता तर दुसरा तुटलेला होता," असे तिने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

फार्महाऊसचा वरचा मजला पूर्णपणे लुटला असून, सर्व बेड तुटलेल्या अवस्थेत होते,  तसेच घरातल्या कीमती आणि मौल्यवान वस्तू एकतर गायब झाल्या आहेत तर काही नष्ट केल्या आहेत, असे तिने तिच्या आरोप पत्रात म्हटले आहे.

लोणावळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश तायडे यांनी पीटीआयला सांगितले की, घटनास्थळी तपासणीसाठी एक पथक पाठवण्यात आले आहे. नुकसान आणि चोरीचे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर आम्ही गुन्हा नोंदवू,

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा