Friday, August 15, 2025

असल्फा देवराळ परिसरात पाण्याची समस्या जटिल

असल्फा देवराळ परिसरात पाण्याची समस्या जटिल

मुंबई : असल्फा परिसरात दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा संपूर्ण भाग देवराळ परिसरातून पाण्याची समस्या नेहमीच उद्भवत असते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन माजी नगरसेवक किरण लांडगे, विजयेन्द्र शिंदे व ईश्वर तायडे यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगर जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांच्या दालनात बैठक पार पडली.

यावेळी साने गुरुजी नगर, लालबत्ती, हनुमान टेकडी, नारायण नगर, मराठवाडा चाळ, दत्त मंदिर परिसर, ओम साई धाम सोसायटी, वीर बजरंग क्रीडा मंडळ, भिम नगर, छत्रपती शिवाजी नगर, नवलादेवी मित्र मंडळ या भागातील पाणी प्रश्नाबाबत असलेल्या वेगवेगळ्या अडचणी सोडवण्याबाबत निवेदन देण्यात आले. त्यात प्रामुख्याने पाण्याचा प्रेशर वाढविणे, अधिक क्षमतेचा पाणीपुरवठा पंप बसविणे, पाण्याची टाकी स्वच्छ करणे, टाकीची संरक्षण भिंत बांधणे, तसेच नवीन पाण्याची लाइन टाकणे इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे.

हा सर्व परिसर डोंगराळ भाग असून पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या करिता मोर्चा, आंदोलने या माध्यमातून अनेक वेळा लढा दिला असून जनतेच्या हक्काचे पाणी त्यांना मिळून देणारच - किरण लांडगे, ( माजी नगरसेवक )

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा