Thursday, August 14, 2025

Reliance Kelivnator Acquisition: रिलायन्स रिटेल निकाल जाहीर होण्यापूर्वीच मोठी बातमी! रिलायन्स रिटेलकडून Kelivnator कंपनीचे अधिग्रहण !

Reliance Kelivnator Acquisition: रिलायन्स रिटेल निकाल जाहीर होण्यापूर्वीच मोठी बातमी! रिलायन्स रिटेलकडून Kelivnator कंपनीचे अधिग्रहण !
प्रतिनिधी: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा भाग असलेल्या रिलायन्स रिटेल लिमिटेड (Reliance Retail Limited) कंपनीने केल्विनेटर लिमिटेड (Kelivnator) कंपनीचे अधिग्रहण केल्याचे घोषित केले आहे. भारतीय रिटेल व्यवसायातील ही मोठी घडामोड मानली जाते. आपल्या इलेक्ट्रॉनिक्स,व रिटेल वस्तूंच्या पोर्टफोलिओत भर टाकण्यासाठी व विस्तारासाठी कंपनीने हे धोरणात्मक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या दर्जेदार उत्पादनांचा पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे असे कंपनीने म्हटले आहे. केल्विनेटर कंपनी भारतात जूनी नाही. १९६० दशकांच्या सुरूवातीलाच कंपनीने भारतात पाऊल टाकले होते ज्याला भारतीय बाजारपेठेत मोठा प्रतिसाद मिळाला होता. कंपनी प्रामुख्याने इलेक्ट्रोनिक्स उत्पादनात कार्यरत आहे.

स्विडीन ब्रँड ' Kelivnator' कंपनीने २०१९ सालीच आपले उत्पादनाचे व वितरणाचे हक्क रिलायन्स रिटेलला विकले होते. कंपनीने अधिकृतपणे आज अधिग्रहणाची घोषणा केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्केट मध्ये या अधिग्रहणानंतर रिलायन्स डिजिटलचा विस्तार देशभर मोठ्या प्रमाणात होणार आहे. १९९५ साली केल्विनेटर कंपनीची भारतीय उपकंपनी 'Kelivnator India Limited ' कंपनीचे व्हर्लपूल इंडिया लिमिटेड (Whirlpool India Limited) कंपनीने अधिग्रहण केले होते. २०१९ साली कंपनीने पुनरागमन करून भारतातील रिटेल व्यवसायातील आपले स्थान पक्के केले होते.

अधिग्रहणाविषयी बोलताना रिलायन्स रिटेलच्या कार्यकारी संचालक व मुकेश अंबानी यांच्या कन्या ईशा एम. अंबानी म्हणाल्या,'आमचे ध्येय नेहमीच तंत्रज्ञान सुलभ, अर्थपूर्ण आणि भविष्यासाठी सज्ज करून प्रत्येक भारतीयाच्या विविध गरजा पूर्ण करणे हे राहिले आहे. केल्व्हिनेटर अधिग्रहण हा एक महत्त्वाचा क्षण आहे, जो आम्हाला भारतीय ग्राहकांना विश्वासार्ह जागतिक नवोपक्रमांची ऑफर लक्षणीयरीत्या विस्तृत करण्यास सक्षम करतो.' केल्व्हिनेटर आता त्याच्या भक्कम परिसंस्थेत (Integrated Ecosystem) मध्ये घट्टपणे एकत्रित झाला असल्याने रिलायन्स रिटेल श्रेणी वाढीला गती देण्यासाठी, ग्राहकांशी संलग्नता वाढवण्यासाठी आणि भारताच्या गतिमान ग्राहकोपयोगी वस्तू बाजारपेठेत दीर्घकालीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक स्थितीत आहे' असेही त्या म्हणाल्या आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पहिल्या तिमाहीच्या उत्पन्न अहवाला पूर्वीच ही घोषणा करण्यात आली. रिलायन्स रिटेलचा महसूल मागील तिमाहीतील ८८,६३७ कोटी रुपयांवरून ४% घसरत ८५,१११ कोटी रुपयांवर येण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे तर ईबीटीडीए (करपूर्व कमाई EBITDA)१% कमी होऊ शकतो असेही विश्लेषक म्हणाले होते. माहितीनुसार, रिलायन्स रिटेल लिमिटेडने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या वर्षात ३३०८७० कोटींची एकत्रित उलाढाल (Consolidated Turnover) होती. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १९.९६ ट्रिलियन रूपये आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >