Raj Thackeray Speech: 'मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार'

  91

मीरा रोड: मीरा रोडमध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन मनसे कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती. यानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्या मोर्चाला उत्तर म्हणून मनसे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीकडून ८ जुलैला मीरा रोडमध्यो मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर  राज ठाकरे स्वत: मीरा रोडच्या दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात हिंदी भाषिकांना मराठी शिकण्याचे आवाहन केले. तसेच महाराष्ट्रात राहताय तर शांतपणे राहा, मराठी शिका. आमचं तुमच्याशी काही वावडं नाहीय. पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा", असा इशारा दिला. राज ठाकरे आज मीरा रोड शहराच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्या हस्ते मीरा रोडमध्ये नित्यानंद नगर येथे मनसेच्या शाखेचं उद्घाटन झालं. त्यानंतर आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. या सभेत राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवला. तसेच महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते पाचवी हिंदी सक्ती होऊ देणार नाही असा पवित्रा धरला. आणि त्यासाठी मग फक्त दुकानं नाही तर शाळा सुद्धा बंद पाडू असा मोठा इशारादेखील दिला.

काय म्हणाले राज ठाकरे?

"मुंबईतून घरातून निघालो आणि इथे पोहोचायला जवळपास २  तास लागले. मी दरवेळेला आपल्या लोकांना सांगतो की, स्वागतामुळे वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे इथे यायला वेळ होतो. आज इकडे मीरा भाईंदरला मी मुद्दामून आलो. त्यादिवशी तो घडलेला जो प्रसंग होता इथला, मीठाईवाल्याचा काहीतरी झाला तो भाग. कानावरती मराठी भाषा समजणार नाही तर कानाखाली बसणारच मराठी. विनाकारण काहीतरी काढत असतात", असं राज ठाकरे म्हणाले. तसेच त्या प्रसंगाची माहिती देताना त्यांनी पुढे सांगितले कि, "छोटा प्रसंग होता तो. मोर्चासाठी म्हणून माझे महाराष्ट्र सैनिक तिथे पाणी प्यायला गेले. तेव्हा माणसाने विचारलं की, कशासाठी मोर्चा काढताय, त्यांनी सांगितलं हिंदी सक्तीचं केलंय म्हणून. म्हणे, इथे तर हिंदीतच बोलतात म्हणे. सगळं हिंदत संभाषण सुरु होतं. त्या माणसाच्या अरेरावीमध्ये त्याच्या जी काही कानफटीत बसायचं ती बसली. लगेच इकडच्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. तुमच्या कानफटात मारली होती का? अजून नाही मारली"

माझे तर सगळ्या भाषेवर प्रेम आहे

राज ठाकरे यांनी भाषणात माझं सर्व भाषांवर प्रेम आहे असे म्हंटले, ते म्हणाले, "बिहारमध्ये आजही ९९  टक्के मातृभाषा बोलतात, हिंदी बोलत नाहीत. हनुमान चालीसा अवधीमध्ये आहे, हिंदी नाही. मराठी भाषेचा इतिहास आपण समजून घ्यायला हवा. माझे तर सगळ्या भाषेवर प्रेम आहे, महाराष्ट्रात जेवढे नेते आहेत, त्यापेक्षा माझे हिंदी चांगली आहे,. याचे कारण माझे वडील... माझ्या वडिलांना उत्तम मराठी हिंदी, उर्दू येत होते. भाषा कधीच वाईट नसते पण आमच्यावर लादणार असाल तर नाही बोलणार.. लहान मुलांवर तर लादू देणारच नाही.."

महाराष्ट्रात राहताय तर शांतपणे राहा, मराठी शिका.

"विषय समजून न घेता, काय झालंय ते माहिती नसताना कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन तुम्ही बंद करणार असाल, तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयत? दुकानं बंद करुन किती काळ राहणार आहात? शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरंच दुकान चालणार ना? महाराष्ट्रात राहताय तर शांतपणे राहा, मराठी शिका. आमचं तुमच्याशी काही वावडं नाहीय. पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा", असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
Comments
Add Comment

Independence Day 2025: मंत्रालयात ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई:

मुंबईत दीड लाख नागरिकांना दरवर्षी भटक्या श्वानांचा दंश

निर्बीजीकरण करून माेकाट कुत्र्यांना आश्रयस्थानात हलवण्याची मुंबईकरांची मागणी मुंबई : दिल्लीतील भटक्या

कोस्टल रोड आजपासून २४ तास वाहतुकीसाठी खुला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई अध

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही