स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी नोंदणीची ऑनलाईन सुविधा

मुंबई : मुंबई महानगरातील नागरिकांना आरोग्याशी संबंधित सुलभ सेवा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तंत्रज्ञानस्नेही पाऊल टाकले आहे. भौगोलिक माहिती यंत्रणेवर आधारित ‘’स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली (ऍप्लिकेशन)’’ सेवा सुरु करण्या त येणार आहे. या सेवेच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित स्मशानभूमी / दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सेवा उपलब्ध होणार आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार मुंबईकर नागरिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्यत खाते आणि माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) वर आधारित ‘’स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली (ऍप्लिकेशन)’’ सेवा सुरु करण्यात येणार आहे.



ऑनलाईन पद्धतीने खालील सुविधा उपलब्ध


निधन झालेल्या / मृत व्यक्तीच्या स्थानापासून ५ किलोमीटर परिसरांतील अथवा निवडीद्वारे संपूर्ण मुंबई महानगरांतील स्मशानभूमी / दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी वेळ नोंदणी (स्लॉट बुक) करणे.


स्मशानभूमी व्यवस्थापनाद्वारे स्मशानभूमी / दफनभूमी मधील उपलब्धता पाहणे.


नागरिकांच्या प्रथेनुसार स्मशानभूमी / दफनभूमी निवडीचा पर्याय.


अंत्यसंस्काराच्या नोंदणीची माहिती, त्यात बदल करणे किंवा रद्द झाल्यास माहिती लघुसंदेश अर्थात ‘एसएमएस’द्वारे प्राप्त होणे


अंत्यसंस्काराची नोंदणी केल्यानंतर, तयार होणा-या नोंदणी क्रमांकामुळे, नोंदणीची खात्रीलायक माहिती नागरिकांना प्राप्त होणार आहे. नोंदणी केलेल्या वेळेमध्ये अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी / दफनभूमीवर पोहोचणे शक्य न झाल्यास नोंदणी केलेला कालावधी हा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून इतरांकरिता प्रणालीमध्ये उपलब्ध केला जाईल.


अंत्यसंस्कारासाठी येणाऱया नागरिकांना या प्रणालीच्या माध्यमातून वेळेचे नियोजन करणे सोपे होईल. तसेच स्मशानभूमीतील कार्यरत कर्मचा-यांसमवेत समन्वय साधण्याकरिता ही प्रणाली उपयुक्त ठरेल. स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली / ऍप्लिकेशन शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in वर नागरिकांसाठी- ‘अर्ज करा’- या सदरात उपलब्ध होणार आहे.


नागरिकांना ऑनलाईन सुविधेबरोबरच, प्रचलित पद्धतीनुसार म्हणजेच स्मशानभूमी / दफनभूमी येथे अंत्यसंस्काराची नोंदणी करण्याची (ऑफलाईन) सुविधादेखील उपलब्ध असेल, असे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या