प्रतिनिधी: सज्जन जिंदाल संचलित जेएसडब्लू स्टीलने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) करोत्तर नफ्यात १५८% वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला मागील वर्षाच्या तिमाहीत ८४५ को टींचा करोत्तर नफा (Profit after tax PAT) झाला होता तो यावर्षी पहिल्या तिमाहीत वाढत २१८४ कोटीवर पोहोचला आहे. कंपनीच्या कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Revenue from Operations) यामध्ये मागील वर्षी तिमाहीतील ४२९४३ वरून वाढत ४३१४७ कोटी रुपये मिळाला आहे. कंपनीला एकूण या तिमाहीत निव्वळ नफा २२०९ कोटींवर पोहोचला असून निव्वळ नफ्यात तब्बल १५५% वाढ झाली आहे.
माहितीनुसार, कंपनीच्या मागील वर्षाच्या तिमाहीतील ४५०४९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ३.४५% उत्पन्न घसरत ४३४९७ कोटींवर पोहोचले आहे. कंपनीच्या खर्चात मागील वर्षाच्या तिमाहीतील ४३०३२ कोटींवरून या तिमाहीत ६.२९% घसरण झाली असून खर्च ४०३२५ कोटींवर पोहोचला आहे. स्टीलची विक्री गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ६.१२ मेट्रिक टन वरून ६.६९ मेट्रिक टन झाली. भारतातील त्यांच्या कामकाजातील विक्री गेल्या वर्षीच्या ५.९० मेट्रिक टन वरून ६.४३ मेट्रिक टन झाली.कंपनीच्या ऑपरेटिंग करपूर्व कमाई (Operating EBITDA) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३७% वाढ झाली आहे.
माहितीनुसार, तिमाहीच्या अखेरीस कंपनीचे निव्वळ कर्ज (Debt to equity ratio) ०.९५ पट होते जे आर्थिक वर्ष २५ च्या चौथ्या तिमाहीच्या अखेरीस ०.९४ पट होते आणि EBITDA वर निव्वळ कर्ज ३.२० पट होते जे आर्थिक वर्ष २५ च्या चौथ्या तिमाहीत ३.३४ पट होते. ३० जून २०२५ पर्यंत निव्वळ कर्ज ७९८५० कोटी होते जे ३१ मार्च २०२५ च्या ३२८७ कोटींपेक्षा जास्त होते. JSW स्टीलनुसार, ही वाढ मुख्यतः खेळत्या भांडवल गुंतवणुकीमुळे झाली. कंपनीने बाजार बंद होण्यापूर्वी निकाल जाहीर केल्यानंतर एनएसईत कंपनीच्या शेअर्समध्ये १%, बीएसईत ०.१०% वाढ झाली आहे.