
पुणे : नगररस्ता - वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अनधिकृत होर्डींगची भरमार असताना केवळ सात अनधिकृत होर्डींगची माहिती देत ३५ अनधिकृत होर्डींगची माहिती लपविणे परवाना निरिक्षकांना भोवले आहे. या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांनी नगररस्ता – वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ लिपिकाला (परवाना निरिक्षक) निलंबित केले आहे. तर, कनिष्ट लिपिक (परवाना निरिक्षक) एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे.

मुंबई : विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात १६ ...
शहरामध्ये अनधिकृत जाहिरात फलक (होर्डिंग) धोकादायक स्वरूपात पुणेकरांच्या डोक्यांवर यमदूतासारखे उभे आहेत. यंदा पावसाळ्यात तीन ठिकाणी होर्डिंग पडली आहेत. शहरात महापालिकेने मान्यता दिलेले २,६४० अधिकृत होर्डिंग आहेत. या वर्षी शहरात पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ घातल्याने पालिकेने पावसाळ्यातील खरबदारीच्या अनुषंगाने तातडीने अनधिकृत होर्डिंग काढून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिले होते. त्यानंतर १४ क्षेत्रीय कार्यालयांनी दिलेल्या अहवालात शहरात केवळ २४ अनधिकृत जाहिरात फलक (होर्डिंग) असल्याचे नमूद करण्यात आले होते.