Saturday, August 2, 2025

वांद्रे कुर्ला संकुलातील भारतनगरमध्ये घर कोसळले, ढिगाऱ्यात १० जण अडकले

वांद्रे कुर्ला संकुलातील भारतनगरमध्ये घर कोसळले, ढिगाऱ्यात १० जण अडकले

मुंबई : वांद्रे कुर्ला संकुलातील भारतनगरमध्ये घर कोसळले. कोसळलेल्या घराच्या ढिगाऱ्यात किमान १० जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी स्थानिक, पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक मदतकार्यात गुंतले आहे. ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या सात जणांना भाभा रुग्णालयात दाखल केले आहे. इतरांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आज (शुक्रवार १८ जुलै २०२५) सकाळी ५.५५ वाजता नमाज कमिटी मशीद वांद्रे पूर्व चाळ क्रमांक ३७ मध्ये एक घर कोसळले. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. मदतकार्य सुरू झाले. एनडीआरएफचे एक पथक पण मदतकार्यासाठी आले आहे.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा