
धक्कादायक! हा बांगलादेशी तरुण २० वर्षांपासून राहत होता किन्नर बनून
भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पोलिसांनी स्वतःला किन्नर (तृतीयपंथी) दाखवून दीर्घकाळापासून राहत असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे. आरोपीचे खरे नाव अब्दुल कलाम असून, तो नेहा किन्नर या नावाने अनेक वर्षांपासून शहरात वास्तव्यास होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल वयाच्या १७ व्या वर्षी भारतात आला होता आणि येथे राहून त्याने बनावट भारतीय कागदपत्रे बनवून आपली खरी ओळख लपवून ठेवली होती. त्याने अनेक भारतीय कागदपत्रे मिळवली होती.
नेहा किन्नर उर्फ अब्दुल कलाम आधी महाराष्ट्रात राहिला
मिळालेल्या माहितीनुसार, नेहा किन्नर उर्फ अब्दुल कलाम आधी महाराष्ट्रात राहिला आणि त्यानंतर भोपाळमधील मंगलवारा आणि बुधवारा भागात तो वास्तव्य करू लागला. त्याने भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड, मतदार कार्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे बनवून घेतली होती आणि समाजात स्वतःला पूर्णपणे किन्नर असल्याचे भासवत होता.
पोलिसांच्या गुप्तचर पथकाला माहिती मिळाली होती की, नेहा हा बांगलादेशी नागरिक असून, वैध कागदपत्रांविना भारतात राहत आहे. या माहितीनंतर तलैया पोलिसांनी कारवाई करत जवळपास आठवडाभरापूर्वी त्याला ताब्यात घेतले.

मुंबई : दारूच्या आहारी गेलेला माणूस एका घोटासाठी काय करेल याचा काही नेम नाही. मग ती मिळवण्यासाठी तो प्रसंगी जीवाचीही पर्वा करत नाही, हे अनेक घटनांमधून ...
गुन्हेगारी पार्श्वभूमीही समोर, २०१९ मध्ये त्याच्यावर एमपी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा
पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, नेहाची गुन्हेगारी पार्श्वभूमीही समोर आली आहे. २०१९ मध्ये त्याच्यावर एमपी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.
भोपाळ पोलीस आयुक्तांनी सांगितले की, शहरात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या परदेशी नागरिकांची ओळख पटवण्याचे अभियान सुरू आहे. आतापर्यंत नेहा किन्नर उर्फ अब्दुल कलामबाबत हद्दपारीचे आदेश जारी करण्यात आलेले नाहीत. परंतु चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला बांगलादेशला पाठवण्याची तयारी केली जात आहे.
पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही संशयित व्यक्तीची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, जेणेकरून शहरात अवैध हालचाली आणि बनावट कागदपत्रांवर आळा घालता येईल.
दरम्यान, या प्रकरणामुळे बांगलादेशी नागरिकांच्या बनावट भारतीय कागदपत्रे बनवून देण्यावरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.